

सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. पदवीधर निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाने AB फोर्म दिला तरी ही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही म्हणून पक्षाने ही निलंबनाची कारवाई केली आहे.
शरद पवारांनी केला महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला. काल पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीचा किताब पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे यांने पटकवला.
पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर ऑटो शोरूममध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीला वेश्याव्यवसाय करण्यास सांगितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३५ वर्षीय तरुणीसह सागर पाषाणकर (वय ४७), रवी गारगोटे (वय ३६) आणि प्रवीण रहाटे (वय ३२) यांच्यालरगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून गँगस्टर छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणाऱ्या चेंबूर परिसरातून त्याच्या जवळच्या साथीदाराला अटक केली. गँगस्टरचा जवळचा साथीदार नीलेश पराडकर याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार.
औरंगाबाद शहरातील शहागंज परिसरातील कापड मार्केटला आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
पुणे विश्रांतवाडी आरटीओ आवारात १० वाहनं जळून खाक झाल्याची घटना साकाळी ८ वाजण्याच्या सुमारात घडली आहे. यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही मात्र गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला लागली आग लागल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात दीप प्रज्वलन करताना त्यांच्या साडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवला आहे. ही देशातील आठवी वंदे भारत ट्रेन आहे. शनिवारपासून तिकिट विक्रीला सुरुवात झाली असून सोमवार 16 जानेवारीपासून नियमीत सेवा सुरु होणार आहे.
नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. बचावकार्य सुरू आहे. सध्या विमानतळ बंद आहे. नेपाळच्या यति एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा परिसराजवळ विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात 72 जण होते. 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा यामध्ये समावेश आहे.
औरंगाबादच्या सहायक पोलीस आयुक्तावरच महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईट ड्युटीवर असताना या पोलीस अधिकाऱ्याने रात्री 2 वाजेच्या सुमारास महिलेची छेडछाड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
बीडच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमानिमित्त पंकजा मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे गहिनीनाथ गडावरून काय बोलणार? अशी चर्चा रंगली होती. पण पंकजा मुंडे यांनी अचानक हा दौरा रद्द केल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
रविवारी देखभालीच्या कामांसाठी मुंबई लोकल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.