दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीकवर

Nepal Plane Crash :  तीन जण अद्यापही बेपत्ता, उद्या पुन्हा शोध मोहीम

कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे झालेल्या विमान अपघातात तीन जण बेपत्ता असल्याने नेपाळ लष्कर उद्या पुन्हा शोध मोहीम सुरू करणार आहे. याबद्दलची माहिती नेपाळ लष्कराकडून देण्यात आली आहे.

परदेशी पाहुण्यांचं मराठमोळं स्वागत!

परदेशी पाहुण्यांचं मराठमोळं स्वागत! G20 परिषदेच्या निमित्तानं हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरियटमधील बैठकीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी काही स्टॉलना भेट दिली. भारतीय पारंपरिक उत्पादनं आणि महाराष्ट्रातील पर्यंटनस्थळांतही त्यांनी रुची दाखवली. मराठमोळ्या स्वागताचं त्यांना कौतुक वाटलं, असं ट्विट पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मुंबईत हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक ठप्प

रे रोड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने साडेतीन वाजल्यापासून लोकल सेवा बंद पडली आहे. मध्यरेल्वेकडून हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे असे मध्यरेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

धनराज विसपुते उमेदवारी अर्ज माघारी घेणार 

विभागीय कार्यालयात दाखल झाले असून धनराज विसपुते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.

गंगाधर नाकोडे यांचा उमेदवारी अर्ज मागे 

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतून गंगाधर नाकोडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत. पक्ष श्रेष्ठी यांनी सांगितल्यामुळे मी हा अर्ज मागे घेत आहे असं नाकोडे यांनी सांगितले आहे.

सत्याजीत तांबेंना निलंबनाची कारवाई करण्याच्या काँग्रेस हायकमांडचे आदेश

आदित्य ठाकरेंकडून सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार

BMC कडून अद्याप टेंडर रद्द नाहीत

माझ्या आरोपानंतर पालिकेने पत्रक काढलं त्यात स्पष्टता नाही.

आदित्य ठाकरेचं इक्बाल चहल यांना पत्र,

४०० किमीच्या रस्त्याचा प्रस्ताव मांडला कोणी? यामध्ये गल्ल्यांचादेखील समावेश

६ हजार कोटीचं काम सरकारन स्वतः मंजूर करण कितपत योग्य? प्रस्ताव देणार आणि मान्यता देणारा एकच

मुंबई करांच्या पैशाचा चुरडा केला. ६ हजार कोटी बजेटमद्ये कसं दाखवणार.

लोकशाहीमध्ये मुंबई सुशोभिकरणातील घोटाळेदेखील

कामासाठी वेळेची डेडलाईन ठरवली आहे का?

1 किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी १७ कोटी लागणार.

लोकांना महागाईपासून मिळाला दिलासा, घाऊक महागाई दर 5 टक्क्यांच्या खाली

देशातील जनतेला आता महागाईपासून दिलासा मिळताना दिसत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये देशातील घाऊक महागाई दरात घट झाली असून तो ४.९५ टक्क्यांवर आला आहे. अशाप्रकारे घाऊक महागाईचा दर ५ टक्क्यांच्या खाली आल्याने दिलासा मिळणार आहे. डिसेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर 4.95 टक्क्यांवर आला असून गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये तो 5.85 टक्क्यांवर होता. अन्नधान्य महागाईचा दर कमी होणे हे त्याचे प्रमुख कारण आहे.

2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील; अमित शहांचं मोठं वक्तव्य

BJP National Executive Meeting : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून सुरू होत आहे. या बैठकीपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान पदाबाबत (Amit Shah) मोठं वक्तव्य केलंय. अमित शहा म्हणाले, 'गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Election) निकाल अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे निकाल गुजरातसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. 2024 मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत, असा स्पष्ट संदेश गुजरात निवडणुकीच्या निकालानं दिलाय. हा काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला संदेश आहे.

पुण्यात नात्याला काळिमा! भावानं केला बहिणीवर बलात्कार

पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीये. अत्ते भावाकडून २५ वर्षीय बहिणीवर बलात्कार करण्यात आला आहे. आरोपीनं Oyo हॉटेलवर नेऊन बलात्कार करत अश्लील फोटो व्हायरल केले आहेत. पुण्यातील येरवडा भागातील ही धक्कादायक घटना आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिलीये. सिध्दलिंगप्पा मलाप्पा मादर (२९) असं आरोपीचं नाव आहे.

दहशतवाद्यांची राम मंदिर उडवण्याची धमकी

दहशतवाद्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. त्यामुळं राम मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत राम मंदिराचं काम पूर्ण होणार आहे.

नाशिक पदवीधरच्या ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल

नाशिक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील या अचानक गायब झाल्या आहेत. शुभांगी पाटील या नॉट रिचेबल असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

जोगेशवरी भागात भंगार गोदामाला भीषण आग

जोगेशवरी भागात भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग कशामुळे लागली आहे हे याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. औरंगाबाद येथील जोगेश्वरी भागात ही आग लागली आहे. त्याचबरोबर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून अपघात कसा झाला काय त्रुटी होत्या ते तपासण्यासाठी ब्लॅक बॉक्सची मदत मिळणार आहे.

खासदार अमोल कोल्हे पुण्यात

खासदार कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज अभिषेक सोहळा निमित्त पुण्यातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून दर्शन घेतले.

राष्ट्रवादीनं भाजपला पुन्हा डिवचलं; पुणे शहरात पुन्हा बँनरबाजी

राष्ट्रवादीनं भाजपला पुन्हा डिवचलं आहे. पुणे शहरात पुन्हा बँनरवर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असा उल्लेख करण्यात आली आहे. संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त बँनर लावले आहेत. डेक्कन चौकात असलेल्या संभाजी महाराज पुतळ्याजवळचं बँनरबाजी करण्यात आली आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन आहे. पुण्यातील डेक्कन पुतळ्याजवळ आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुतळ्याच्या खाली धर्मवीर नावं फुलांनी सजवलं आहे. तर त्या समोरचं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणून राष्ट्रवादीची बँनर लावले आहेत. पुण्यातील डेक्कनमध्ये शंभूप्रेमी मोठ्या संख्येने जमले आहेत.

जी २० परिषदेचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

जी २० परिषद याला आज सुरुवात झाली आहे. जी २० परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, मी स्वतःला भाग्यशाली समजतो माझ्या हस्ते या परिषदेच उद्घाटन झालं. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. मोदी जी यांच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करतो आहोत. अमेरिका, चायना, जपान जर्मनी यानंतर भारत ५वे येण्याच्या प्रयत्नात आहे.मला अभिमान आहे नरेंद्र मोदी जी यांच्यावर कारण ते जे बोलतात ते पूर्ण करतात. जगातील शहरातील विकास कसा होईल याच्यावर ही परिषद आहे पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत असं राणे म्हणाले आहेत.

मुंबई गारठली! मोसमातील सर्वात कमी तापमान, पारा 13.8 अंशावर

मुंबईत या वर्षीच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत आज सकाळी पारा 13.8 अंशावर पोहोचला होता. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत 15 ते 17 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून गेल्या आठवड्यामध्ये वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर