दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
sakal breaking notifiction
sakal breaking notifiction

नाशिक पदवीधर निवडणुकीत कपिल पाटीलांचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सत्यजित तांबे, त्यांचे वडील सुधीर तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव; आगीत बस जळून खाक

नाशिकच्या चांदवड घाटात बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

पुण्यातील दोन मतदार संघांसाठी पोटनिवडणुक जाहीर

पुण्यातील दोन मतदार संघांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार संघासाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

तसेच चिंचवड विधानसभेसाठी पण पोटनिवडणूक जाहीर

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवड चे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या

या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे

२७ फेब्रुवारी मतदान तर २ मार्च रोजी निकाल

भाजप विरोधात दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता

विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात; दोन ठार तर 8 गंभीर

विठूरायाच्या दर्शानासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. उमदीहून मंगळवेढामार्गे पंढरपूरकडे जाताना येद्राव फाटा येथे हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी प्रवाशांना सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी हे मध्य प्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सपा नेत्याच्या 26 वर्षीय मुलीला दोन मुलांचा बाप असणाऱ्या भाजप सरचिटणीसानं नेलं पळवून

हरदोई : यूपीच्या हरदोई जिल्ह्यात भाजप नेत्यावर (BJP leader) सपा नेत्याच्या मुलीचं अपहरण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सपा नेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे. भाजपचे शहर सरचिटणीस आशिष शुक्ला (Ashish Shukla) यांच्यावर 26 वर्षीय तरुणीचं अपहरण केल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळं पक्षाची बदनामी झाल्यानं भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या भाजप नेत्याची हकालपट्टी केलीये. हे संपूर्ण प्रकरण हरदोई शहरातील कोतवाली परिसरातील आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत दाखल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांची सुनावणी लांबणीवर

स्थानिक स्वराज्य संस्थांची सुनावणी लांबणीवर पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

चेंबुरमध्ये इमारतीवरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू

चेंबुरमध्ये इमारतीवरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत.

उद्या 'या' वेळेत बंद राहणार मुंबई मेट्रा सेवा

मुंबईतील नोकरदार वर्गासाठी लोकल ट्रेन खुप महत्वाची आहे. मुंबई मेट्रो देखील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा पर्याय आहे. उद्या म्हणजेच 19 जानेवारीला मुंबई मेट्रोची घाटकोपर ते वर्सोवा ही सेवा बंद राहणार आहे.

राज ठाकरे यांना मोठा दिलासा! अटक वॉरंटसंबधी मोठी अपडेट

राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर झाले होते. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. येत्या वर्षभरात नऊ राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापैकी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांची आज दुपारी अडीच वाजता घोषणा होणार आहेत.

रत्नागिरीतमध्ये घरात झालेल्या सिलेंडर स्फोटात दोन महिलांचा मृत्यू

रत्नागिरीमधील शेट्येनगरमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना पहाटेच्या दरम्यान घडली आहे. स्फोट झाल्यानंतर घरात दोन जण अडकले होते त्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर यामध्ये 2 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

रत्नागिरीतमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट, स्फोटात घराचं मोठं नुकसान

राज ठाकरे यांचं परळीत जंगी स्वागत; गोपीनाथ गडावर घेतलं दर्शन 

राज ठाकरे यांचं परळीत राष्ट्रवादीकडून जोरदार स्वागत

 राज ठाकरे आज बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात राहणार हजर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे आज राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार आहेत.

बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरातून मेट्रो साहित्याची चोरी

बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरातून मेट्रो साहित्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या परिसरातून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी कंटेनर मधून अज्ञात चोरट्याने एक लाख 42 रुपये किमतीचे साहित्य चोरले आहे. अगमपाल सुरजित सिंग धूपर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंडगार्डन मेट्रो स्टेशन या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा करण्यात आला होता. चोरट्यांनी लोखंडी कंटेनर स्टोअर चे लॉक तोडून दहा इलेक्ट्रिक वायरचे बंडल, एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे १६ लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, तांब्याचे पाईप्स, कटर मशीन, ड्रिल मशीन असा एकूण एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुढच्या महिन्यात पुण्यात येणार

१ फेब्रुवारीला संजय राऊत पुण्यात येण्याची शक्यता आहे. राऊत यांच्या हस्ते बाळकडू २३ या छाया चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. पुण्यातील बालगंधर्व आर्ट गॅलरीत हा कार्यक्रम होणार आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदाच पुण्यात येणार आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून संजय राऊत यांचं जंगी स्वागत करण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना भीषण आग

पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवार पेठ येथे असलेले या जुना बाजार मध्ये अनेक वस्तूंची दुकान आहेत. यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामन जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. मात्र नेमकी या कशामुळे लागली होती याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ

एकाच आठवड्यात सोन्याचे दरात हजार रुपयांची वाढ होऊन 57 हजार 500 रुपयांवरुन 58 हजार 500 रुपयांवर सोन्याचे दर पोहचले आहेत. आतापर्यंतचा हा सोन्याच्या दराचा उच्चांक मानला जातो. कारण मागील दोन वर्ष पूर्वी सोन्याचा दर हा 58 हजार 500 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. यावेळी मात्र त्यापेक्षा पाचशे रुपयांची वाढ जास्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने हे दर त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. 

रत्नागिरीतमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट, स्फोटात घराचं मोठं नुकसान

रत्नागिरीमधील शेट्येनगरमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना पहाटेच्या दरम्यान घडली आहे. स्फोट झाल्यानंतर घरात दोन जण अडकले होते त्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या स्फोटामध्ये घराचं मोठं नुकसान झालं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com