
ज्या शेतकर्यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे अशा शेतकर्यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिले आहेत.
वरुण सरदेसाई यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला. तुम्ही सांगितलेल्या प्रश्नांवर पर्याय काढला जाईल. तुम्ही आपलं काम सुरु ठेवा, असे सांगून वरुण सरदेसाई यांनी या महिला पदाधिकाऱ्यांचे मन वळवण्यात यशस्वी झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा दुसरा पती आहे. फिर्यादी महिलेची पहिल्या पतीपासून झालेली ११ वर्षाची मुलगी त्यांच्या सोबतच असते. ९ नोव्हेंबर रोजी घरात कुणी नसताना या आरोपीने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य करत लैंगिक शोषण केले.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. दोघांमध्ये गेल्या तासाभरापासून बैठक चालू आहे.
इंडोनेशियामधील जकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात 46 जणांचा मृत्यू झाला असून 700 जण जखमी आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाल्याची माहिती देखील समोर आलीआहे.
होय हे आपले सरकार ! आजपर्यंत कुणी घेतला नसेल असा नवा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे, तो असा मंत्रालयाचे दरवाजे सर्वसामान्यांना बंद करून सुनावणी असल्याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयात कोणासही प्रवेश राहणार नाही. पत्रकारांनाही दुपारी तीन नंतर प्रवेश दिला जाईल . #आपले सरकार.
राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि मुंबईतील वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना पत्र पाठवलंय. आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने त्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना उद्देशून हे पत्र लिहिलं आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही? असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखेर सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्टीकरण देत भाजपला टोला लगावला होता. यावर त्या म्हणाल्या की, 'माझं भाषण नीट ऐका, एकूण 35 मिनिटांचं भाषण होतं. माझी विनंती आहे की, पूर्ण ऐकावं. थोडा वेळ पाहून ऐका त्यात मी काय म्हटलं. मी सविधानावर विश्वास ठेवणारी आहे. माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते आमचे विरोधक करत आहे. ते आमचं काही कौतुक करणार नाही. त्यांनी फार टीका केली त्या त्याबद्दल काही वाटत नाही. माझी आई नेहमी सांगते निंदकाचे घर हे शेजारी असावे, ते विरोधक काम पूर्ण करत आहे. आज टेक्नॉलाजी वाढली आहे. पण त्याचा गैर वापर होत आहे. जर 35 मिनिटांचं भाषण हे 17 सेकंदाचं सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला.
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त झोन ३ सुहेल शर्मा, पोलिस उपायुक्त ट्रॅफिक विभाग विजय मगर, महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासह राज्यमार्ग व्यवस्थापन अधिकारी यांची नवले पुल घटनास्थळी भेट दिली आहे.
नार्कोटेस्ट करण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्या पूर्ण झाल्यानंतर श्रद्धा मर्डर केसमधील आरोपी अफताबची नार्को टेस्ट केली जाईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवले पुलावरील अपघातातील कंटेनरचे ब्रेक फेल झाले नव्हते अशी माहिती समोर आली आहे. तर यामुळे चालकाला शोधणे महत्वाचे बनले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आज महत्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कॉग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण बैठकीसाठी पोहचले आहेत.
श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आज अफताबची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. नार्को टेस्टमध्ये आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपालांच्या विरोधात पुण्यात हटके आंदोलन केले आहे. डमी राज्यपाल उभारून प्रतीकात्मक धोतर फेडल असून सावरकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच इतर राष्ट्रपुरुषांचा वारंवार अपमान करीत असतात. महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपाने या राज्यपालांना महाराष्ट्राचा वारंवार अपमान करण्याकरिताच महाराष्ट्रात नेमलेलले आहे अशी टीका राष्ट्रवादी कडून यावेळी करण्यात आली आहे.
केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर राज्यपाल आणि सुधांशु त्रिवेदीनी माफी मागावी असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
गिरगावमध्ये आंदोलनस्थळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात येत आहेत. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबईत वाढवण बंदराविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. स्थानिकांच्या या आंदोलनाला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. पालघर जिल्ह्यातील शेकडो नागरिक एकत्र आले आहे. बंदराविरोधात संघर्ष समितीचे आंदोलन सुरू झाले आहे.
पुण्यातील नवले पुलाची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. काल रात्री घडलेल्या घटनेची पाहणी त्यांनी केली आहे.
1) राहुल भाऊराव जाधव रा.वारजे
2) शुभम विलास डांबळे रा. सदर
3) तुषार बाळासाहेब जाधव रा. सदर
तिघेही उपचार कामी नवले हॉस्पिटल येथे
4)आनंद गोपाळ चव्हाण रा. सहयोग नगर, पुणे
माई मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचारकामी
5) राजेंद्र देवराम दाभाडे रा. माणिकबाग पुणे
मोरया हॉस्पिटल येथे उपचारकामी
6) साहू जुनेल रा.कोंढवा पुणे
7)ऑस्कर लोबो रा. कोंढवा पुणे
रुबी हॉल हॉस्पिटल येथे उपचारकामी
8) मधुरा संतोष कारखानीस वय 42 वर्ष रा. वनाज
9)चित्रांक संतोष कारखानीस वय 8 वर्ष
10) तनीषा संतोष कारखानीस वय 16 वर्ष
11)विदुला राहुल उतेकर वय 45 वर्ष रा. सदर
सर्व उपचारकामी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे
12) अनघा अजित पभुले वय 51 वर्ष रा. वडगाव पुणे
उपचारकामी जगताप हॉस्पिटल पुणे येथे
13)अनिता अरुण चौधरी वय 54 वर्ष रा. राहटणी चौक, पुणे
उपचारासाठी जगताप हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
नवले पुलाजवळील अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक मनीलाल यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चालक उत्तर प्रदेशचा चालक आहे, तो सद्या फरार असून काल रात्री झालेल्या अपघातप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक झाले असल्याचे सांगत नवा वाद निर्माण करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असे शिवसेनेने आपल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
नवले ब्रिज आणि स्वामी नारायण मंदिरासमोर काल रात्री दोन भीषण अपघात झाले. या अपघातांची दखल घेत खासदार सुप्रियाताई सुळे या नवले ब्रिज ते दरीपुल या भागात अपघातस्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत. आज (दि. २१ नोव्हेंबर) सकाळी सव्वादहा वाजता त्या याठिकाणी भेट देतील.
बदलापूर शहरातील सर्व रिक्षा चालकांनी बेमुदत संप पुकारला असून आज सलग तिसऱ्या दिवशीही हा संप सुरू आहे. सोबतच रिक्षा स्टॅन्डच्या मागणीसाठी रिक्षा चालकांनी साखळी उपोषण सुरु केल आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील रिक्षा सेवा मात्र पूर्णपणे ठप्प झाली असून त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
केंद्र सरकारकडून आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आजपासून अर्थसंकल्पपूर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून सर्वत्र तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली आलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचाअंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांच्यावतीने नोटीस देण्यात आलीय. अरबी समुद्रात होणारे जलसमाधी आंदोलन थांबवा, अन्यथा पोलीस कारवाई करू, असा इशारा या नोटीशीतून तुपकर यांना देण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजता बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रल्हाद काटकर यांनी तुपकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.