Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

शेतकऱ्यांना दिलासा.. मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून परतला माघारी

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) यंदाचा परतीचा प्रवास अखेर संपला. राज्यासह संपूर्ण देशाचा निरोप घेत मॉन्सून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता दक्षिण भारतातील राज्यात ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला सुरवात झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.यंदा वेळे आधीच मॉन्सूनने देशात आगमन केले होते.

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरुन शपथपत्र दाखल

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरुन शपथपत्र दाखल केली आहेत. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतं पाहवं लागणार आहे.

घोषणांची अतिवृष्टी आणि भावनांचा दुष्काळ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

माझ्या शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळाली पाहिजेल. भावनांचा दुष्काळ आहे म्हणून ओला दुष्काळ जाहीर नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विरोधी पक्षात आहे, म्हणून मी तीथं आलो नाही.

आत्महत्येचा विचार बळीराजानं करु नये. दिवाळी साजरी करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही का? असा सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. हेक्टरी ५० हजाराची मदत प्रत्येक शेतकऱ्याचा मिळाली पाहिजेल. शेतकऱ्यांने आता सरकारला घाम फोडला पाहिजेल. आमच्याशी गद्दारी केली बळीराजाशी गद्दारी करु नका. अजून किती पाऊस पडल्यावर ओला दुष्काळ जाहीर कराल? घरात सगळ दिल तरीही जे बाहेर गेले ते दुसऱ्यांची घरं काय भरणार?

वेळ आली तर मी रस्त्यावर उतरेन. असा सूचक इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच, विरोधी पक्ष नव्हे तर

आनंदाचा शिधा कोणालाही भेटला नाही. डोळ्यासमोर शेतकऱ्यांच सोनं मातीमोलं झाला. शेतकऱ्यांच दिवाळं निघाल. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.

धीर सोडू नका, मदतीसाठी सरकराला भाग पाडू- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. नुकसानीची पाहणी करत माहिती जाणून घेतली. तर शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. तर धीर सोडू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू यात असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला

कर्ज नोटिसा थांबवा शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्यासमोर मागणी

दिवाळी काशी साजरी करू? शेतकऱ्यांचा ठाकरे यांना सवाल

धीर सोडू नका, मी तुमच्यासोबत आहे ठाकरेंच शेतकऱ्यांना आवाहन

राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल

राज्यात परतीच्या पावसाने मराठवाड्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून राज्यातून परतला

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज मान्सून राज्यातून परतला असून आता पुन्हा पावसाची शक्यता नाही. या वर्षीचा मान्सून पुर्णपणे परतला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ओडीशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सित्रांग चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्याचा फटका या दोन राज्यांना बसण्याची शक्यता आहे

विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

दिवाळी सुरू असतानाच शहरात जागोजागी फटाक्यांचे मोठे स्टॉल लागलेत. अशातच आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग लागली. आग लागल्यानंतर फटाक्यांनीही पेट घेतला. आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सध्या घटनास्थळीअग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार; दानवे यांचा सरकारला इशारा

शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अंबादास दणवे यांनी दिला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. ते आज नुकसानग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता मोदी घेणार श्रीरामाचे दर्शन घेणार असून शरयू नदी घाटावर मोदींच्या हस्ते आरती होणार आहे. 5:45 वाजता मोदींच्या हस्ते श्रीरामाचा राज्याभिषेक होणार आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या राज्यभरात परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचबरोबर राजकीय घडामोडी, क्रीडा या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर

राज्यात परतीच्या पावसाने मराठवाड्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची ठाकरे पाहणी करणार आहेत.