Marathi News Live Update: दसरा मेळाव्यासह दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Dasara Melava 2022
Dasara Melava News Updates
Shivsena Dasara Melava 
Shivsena Dasara Melava News Updates
Shinde Group Dasara Melava
Dasara Melava live News
Shinde Group Dasara Melava Teaser
BKC Dasara Melava
Shivaji Park Dasara Melava
दसरा मेळावा 2022
Dasara Melava 2022 Dasara Melava News Updates Shivsena Dasara Melava Shivsena Dasara Melava News Updates Shinde Group Dasara Melava Dasara Melava live News Shinde Group Dasara Melava Teaser BKC Dasara Melava Shivaji Park Dasara Melava दसरा मेळावा 2022esakal

शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींवर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीची वकीली केली, असं भाजपने म्हटलंय.

इंडिया आघाडी म्हणजे १० तोंडी रावण- एकनाथ शिंदे

हे फक्त मोदींवर टीका करतात. पण, मोदींमुळं देशानं झेप घेतलीय. इंडिया आघाडी म्हणजे १० तोंडी रावण आहे. त्यांचं दहन जनता करेल. २०२४ ला मोदीच येतील. राज्यात ४५ जागा आमच्या निवडून येतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवरायांची शपथ घेतो, आरक्षण देणारच- एकनाथ शिंदे

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, असं ते म्हणाले. यावेळी ते व्यासपीठावर असलेल्या महाराजांच्या प्रतिमेसमोर जाऊन ही शपथ घेतली आहे.

मी शिवसेना वाचवली, धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवला तो सोडवला- एकनाथ शिंदे

मी शिवसेना वाचवली. धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवला तो मी सोडवला. सरकार पडणार पडणार म्हणता पण आता आम्हाला २१० आमदारांचा पाठिंबा आहे .आता तुम्ही म्हणता मुख्यमंत्री बदलणार, पण मला पदाची चिंता नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांनी ज्यांना नाकारलं त्यांचे तळवे तुम्ही चाटत आहात- एकनाथ शिंदे

बाळासाहेबांनी ज्यांना नाकारलं त्यांचे तळवे तुम्ही चाटत आहात. महा गद्दार आहात तुम्ही, असं एकनाथ शिंदे सभेत म्हणाले.

- यांनी सेनेच्या खात्यातील ५० कोटी मागितले. पण निवडणूक आयोगाने त्यांना पैसे देता येणार नाही असं सांगितलं.

- आमच्यावर ५० खोक्यांचे आरोप करता... पण स्वतः ५० कोटींसाठी आमच्याकडे येता.

- यांना खोके चालत नाहीत... यांना कंटेनर पाहिजेत. योग्य वेळेला बोलेन

- वाघनखांवर आणि शिवाजी महाराजांच्या शौर्यावर असे लोक संशय घेऊ लागले.

- यांनी अफझल खानाचा आदर्श स्वीकारला आहे.

कुलभूषण जाधव यांची आठवण आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल

आमची तुलना मुजाहिद्दीन सोबत करण्यात आली. कोणी पंतप्रधान असं करत असतो का? आमच्यावर टीका करा, आम्ही तुमच्यावर टीका करु. पण, आम्हाला तुम्ही देशद्रोही ठरवता. तुम्हीच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळता. त्यामुळे तुम्ही खर देशद्रोही आहात. कुलभूषण जाधव यांची तुम्हाला आठवण आहे की नाही? असं म्हणत त्यांनी मोदी सरकावर टीका केली.

मोदी सरकारनं मणिपूरमध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणावी; उद्धव ठाकरेंचे आव्हान

मोदी सरकार गेलंच पाहिजे. उद्या आपलं सरकार येणार आहे. आमच्या लोकांना त्रास देऊ नका. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये जावं आणि हनुमान चालिसा म्हणावी. भाजपने सगळे कावळे गोळा केले आहेत. त्यामुळे आपलं सरकार नक्की येणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मनोज जरांगेंचे मी धन्यवाद मानतो- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मनोज जरांगे पाटलांचे धन्यवाद मानले. ते आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. त्यांनी आता धनगर समाजालाही आव्हान केले आहे. शांततेत होणाऱ्या आंदोलनावर लाढीचार्ज झाला. मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. लोकांवर लाढीचार्ज झाला हे दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र तितका लोळवावा लोकांचा दुसरा दसरा मेळावा; संजय राऊतांची टीका

शिवतीर्थावरुन बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. महाराष्ट्र तितका लोळवावा लोकांचा दुसरा दसरा मेळावा तिकडे सुरु आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली.

आझाद मैदानावर पहिल्या भाषणाला सुरुवात

आझाद मैदानावर पहिल्या भाषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. ठाकरे आडनाव लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही म्हणत त्यांनी घणाघात केला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही टीका केली. ते शरद पवारांची चाकरी करतात असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल, तोफ धडाडणार

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. त्यांनी आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार घालून वंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे , तेजस ठाकरे हे देखील उपस्थित आहेत.

uddhav thackeray
uddhav thackeray

मुख्यमंत्र्यांनी क्रॉस मैदानावर केलं रावण दहन

ख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानावर येण्याआधी क्रॉस मैदानावर सुरू असलेल्या राम लीला महोत्सवातील रावण दहन सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यांनी रावणाला यावेळी बाण मारला.

उद्धव ठाकरे शिवतीर्थाकडे रवाना

उद्धव ठाकरे शिवतीर्थाकडे रवाना झाले आहेत. थोड्यावेळात त्यांची तोफ धडाडणार आहे. मेळाव्यात ते काय बोलतीय याकडे राज्याचं लक्ष आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानाकडे रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानारडे रवाना झाले आहेत. अगदी काही मिनिटांत ते मैदानावर पोहोचतील.

दसरा मेळावा फक्त एकच असतो- अंबादास दानवे

दसरा मेळावा फक्त एकच असतो. गद्दारांनी आता घरी जाण्याची तयारी करावी. तुमच्याकडून महाराष्ट्राच्या हिताचं काहीही झालेलं नाही. तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी केली आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीका केली.

एकनाथ शिंदे सभेसाठी रवाना

एकनाथ शिंदे सभेसाठी आझाद मैदानासाठी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानावर येण्याआधी क्रॉस मैदानावर सुरू असलेल्या राम लीला महोत्सवातील रावण दहन सोहळ्याला उपस्थित राहून त्यानंतर सभास्थानी येणार आहेत.

शिवसैनिकाच्या मशाल बाईकने वेधले सगळ्यांचे लक्ष

सातारा जिल्ह्यातील सताव तालुक्यातील सुनील पाटील हे शिवसैनिक गेल्या बारा वर्षापासून न चुकता दसरा मेळाव्याला येत आहेत. यंदा ते आपली आगळीवेगळी बाईक घेऊन सभेला आले.

अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. मराठा तरुणांनी सभेमध्ये एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या.

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर शिवसेनेच्या पताका

संपूर्ण शिवाजी पार्कच्या परिसर ठाकरे गटाने पताकांनी सजवला आहे. राज ठाकरेंचा घरही शिवाजी पार्कच्या अगदीच बाजूला असल्यामुळे त्यांच्या घरालाही पताका लावण्यात आलेल्या आहेत. दुसरीकडे राज ठाकरेंच्या घराच्या दिशेने असलेल्या रस्त्याला बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे.

धनगर समाजाने आरक्षणासाठी लढावं- जरांगे पाटील

धनगर समाजाने शांत बसू नये, त्यांनी आरक्षणासाठी लढावं. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार. समाजाशी गद्दारी करणार नाही, असं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते चौडी येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.

माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा मोठा निर्णय

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रणिती शिंदे याच राजकारणात सक्रीय राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अमित देशमुख यांचा ताफा मराठा आंदोलकांनी रेणापूरमध्ये अडवला

मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापत आहे. यातच काँग्रेस नेते अमित देशमुख यांचा ताफा मराठा आंदोलकांनी रेणापूरमध्ये अडवल्याची घटना घडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपत आहे.

'आता मी थांबणार नाही', पंकजा मुंडेंनी केला निर्धार

दसरा मेळाव्यात बोलताना , पंकजा मुंडेंनी निर्धार केला आहे. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधी झुकणार नाही, अशी घोषणा पंकजा मुंडेंनी केली. माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी मी मैदानात उतरणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आणि त्याचं भाषण संपवलं आहे.

वडापाव खाऊ पण निष्ठावंत राहू; नाशिकमधील शिवसैनिकांचा ठाकरे गटाला पाठिंबा

वडापाव खाऊ पण निष्ठावंत राहू असं म्हणत नाशिकमधील शिवसैनिकांनी ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे. नाशिक जिल्ह्यातून शिवसैनिक दादर स्थानकावर पोहचले आहेत. नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष शहर प्रमुख व इतर कार्यकर्ते शिवतीर्थावर पोहचले आहेत.

दोन दिवसांत तुम्ही ११ कोटींंचा चेक जमा केले - पंकजा मुंडे

माझ्या कारखान्यावर छापे पडले तेव्हा तुम्ही कोट्यावधी रुपये जमा केले, मी हरले तरी मी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडे खदखद वक्त करणार? मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी

पंकजा मुंडे खदखद वक्त करणार? मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.

भगवान बाबांचे दर्शन, आरती, कन्या पूजन करून पंकजा मुंडे व्यासपीठावर

भगवान बाबांचे दर्शन, आरती, कन्या पूजन करून पंकजा मुंडे व्यासपीठावर आल्या आहेत. आज दसरा मेळाव्याच्या निमीत्ताने पंकजा, प्रीतम आणि यशश्री मुंडे या तिघी बहिणी एकत्र आहेत. काही वेळातच पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला सुरूवात होणार आहे.

सावरगावात पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत

सावरगावात पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. काही वेळात त्यांच्या मेळाव्याला सुरूवात होणार आहे.

युवा संघर्ष यात्रा ही नव्या पिढीची दिंडी- शरद पवार

रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे.या यात्रेची सुरूवात शरद पवार यांच्या भाषणाने होत आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले युवा संघर्ष यात्रा ही नव्या पिढीची दिंडी आहे.

पंकजा मुंडे येण्याअगोदर सभास्थळी गोंधळ

पंकजा मुंडे येण्याअगोदर सभास्थळी गोंधळ निर्माण झाला आहे. सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर होत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमात त्या येण्याआधी मोठी गोंधळ निर्माण झाला आहे. गोंधळ घालणाऱ्यांना समज देण्यासाठी पोलीस पोहोचले आहेत.

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी सावरगावात मुंडे समर्थकांची गर्दी

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी सावरगावात मुंडे समर्थकांची गर्दी झाली आहे. पंकजा मुंडे यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या आशिर्वाद सभेला मोठी गर्दी

रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या आशिर्वाद सभेला मोठी गर्दी झाली आहे. स्टेजवर देखील कार्यकर्ते बसले आहेत. सभागृहाबाहेर देखील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. टिळक स्मारक येथे ही आशिर्वाद सभा होत आहे.

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द

पुण्यातून नाशिकला जात असताना अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. अजित पवार आज नाशिकला कार्यक्रमासाठी जाणार होते. मात्र, त्यांना घेण्यासाठी येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते मुंबईत थांबवण्यात आलं आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द झाला आहे.

हेलिकॉप्टर मुंबईहून अजित पवार यांना पुण्यातून घेऊन नाशिकमध्ये जाणार होते. मात्र, हेलिकॉप्टर वेळेत न आल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. नाशिकनंतर अजित पवार यांचा अहमदनगर दौरा होता

रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला सुरूवात

रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला सुरूवात झाली आहे. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला मोठी गर्दी जमली आहे. पुण्यातून आज या यात्रेला सुरुवात झाली.विजयादशमीच्या मुहूर्तावर पुण्यातील मध्यवर्ती भागातून ही यात्रा सुरू आहे. टिळक स्मारक मंदिरात या यात्रेला खासदार शरद पवार संबोधित करणार आहेत. युवा पिढीच्या प्रश्नाकडे सरकार ने गांभीर्याने बघावं या मागणीसाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईच्या हवेच्या दर्जात सुधारणा नाहीच !

मुंबईच्या हवेचा दर्जा अजूनही खालावला असल्याचे समोर येत आहे. सकाळी धुरके आणि दुपारी उन्हाचे चटके असे वातावरण सध्या मुंबईकर अनुभवत आहेत. परिणामी आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दोनशे गुणवत्ता निर्देशांकामुळे चेंबूरच्या हवेची सर्वाधिक प्रदूषित अशी नोंद झाली आहे. सोमवारी मुंबईचा एक्यूआय १२७ होता. हवेचा दर्जा मध्यम आणि पीएम दहा नोंदला गेला.

भारत सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे जात आहे, मोहन भागवतांचं वक्तव्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपूरमध्ये पार पडत आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केलं. भारत सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे जात आहे. डिजीटल क्षेत्रामध्येही भारताचा वेगाने विकास होत आहे. देशात G-20 चं आयोजन यशस्वीपणे पार पडलं. २२ जानेवारीला रामलल्ला अयोध्येच्या मंदिरात प्रवेश करणार.. असं मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

रोहित पवारांची आजपासून संघर्ष यात्रा

राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून युवा संघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे पुण्यातून या यात्रेला सुरुवात होईल पुणे ते नागपूर असा हा 800 किलोमीटरचा प्रवास असणार आहे एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.

नागपुरातील संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव; शंकर महादेवनची उपस्थिती

नागपुरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव साजरा केला जात आहे. प्रमुख पाहूणे म्हणून शंकर महादेवन उपस्थित आहेत. शस्त्रपुजेनंतर मोहन भागवत संबोधन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत.

दादरमधील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा, तर मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही 'विजयादशमी उत्सव' सुरू आहे. या दसरा मेळाव्यातील भाषणांकडे राज्याचं लक्ष आहे. त्याचबरोबर देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com