Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Marathi News Live Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

Dharashiv News: धाराशिवमध्ये दोन गटात दगडफेक; पोलिसांचा फौजफाटा तैनात

धाराशिवमध्ये दोन गटामध्ये दगडफेक झाली आहे. यावेळी पोलिसांना अश्रूधूर कांड्या फोडाव्या लागल्या आहेत. दगडफेकीचे कारण समजू शकलेलं नाही.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्याकडून मंगळवारी भोर तालुक्यातील १२ गावांचा दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या भोर तालुक्यातील १२ गावांचा दौरा करणार आहेत. त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

UN Security Council: गाझामध्ये तात्काळ युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मंजूर

गाझामधील संघर्ष थांबावा यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलेला युद्धविरामाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

Prakash Ambedkar: अभय पाटील यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांनी भेट

काँग्रेसकडून अकोल्यातून उमेदवारासाठी इच्छुक असलेले अभय पाटील यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. आंबेडकरांनी अकोल्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

MVA Meeting: मातोश्रीवरील मविआच्या नेत्यांची बैठक संपली

मातोश्रीवरील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. जागावाटप उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

Nashik News: नाशिकमध्ये भाजप वरचढ, ताकद जास्त- देवयानी फरांदे

नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. नाशिकच्या भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. भाजपची जिल्ह्यात ताकद जास्त आहे. त्यामुळे निवडून येऊ शकेल याला उमेदवारी मिळावी, असं भाजप नेत्या देवयानी फरांदे म्हणाल्या आहेत.

पुण्यात राजाराम पूलाजवळ सहा ते सात गाड्यांचा विचित्र अपघात

सिंहगड रस्ता, ता. २५ : ज्येष्ठ नागरिकाचे आपल्या कार वरील नियंत्रण सुटल्याने येथील राजाराम पुल चौकात झालेल्या अपघातात एका युवकासह ज्येष्ठ नागरिक महिला जखमी झाले आहेत.

सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजा बर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार वडगावहून राजाराम पुलाकडे एक कार निघाली होती. ही चार चाकी गाडी ज्येष्ठ नागरिक चालवत होते गाडीत सोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या. अचानक त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडीने पुढील वाहनांना धडक दिली.

यात दोन रिक्षा, एक दुचाकी आणि एका कारला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालवणारा पंचवीस वर्षीय युवक जखमी झाला. तसेच ज्यांच्या कारची धडक इतर गाड्यांना बसली त्याच कार मधील जेष्ठ नागरिक महिला देखील जखमी झाली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेले असून अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

जानकर असोत नाही तर कोणीही मी लढणारच; शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महायुतीसोबतच असणार आहेत. त्यांना बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी देण्याची चर्चा आता सुरु झाली आहे. यापूर्वी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यामुळं पवार कुटुंबियांविरोधात निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे ठाम आहेत. पण जानकरांचं नाव बारामतीतून पुढे आलं तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचाराला सुरुवात

सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे. प्रणिती या स्थानिक उमेदवार आहेत पण सातपुते हे बीडचे रहिवासी आहेत अन् भाजपनं त्यांना सोलापुरातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळं सातपुतेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

माजी क्रिकेटर युसूफ पठाणनं दिल्या होळीच्या शुभेच्छा!

देवयानी फरांदे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर

देवयानी फरांदे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. आपल्या अनेक समर्थकांसह त्या भेटीसाठी गेल्या आहेत.

काँग्रेसची सहावी यादी आली समोर! 'या' पाच जागांवरील उमेदवार जाहीर

पोलिस हल्ल्याच्या विरोधात भाजप प्रदेशाध्यक्षांचे निदर्शने

तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या कथित हल्ल्याच्या विरोधात निदर्शने केली.

उज्जैन मंदिर दुर्घटनेत जखमी झालेल्यांसाठी मोदींकडून प्रार्थना

उज्जैन येथील मंदिरातील आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकर बरं होण्यासाठी मोदींनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

सांगलीच्या इरळी गावात मुंबई गुन्हे शाखेचा छापा

एमडी ड्रग्जच्या संशयावरुन मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगलीतल्या इरळी गावामध्ये छापा मारला आहे.

Pune Fire News : रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील कचरा संकलन केंद्राला आग

रामटेकडी औद्योगिक वसाहत मध्ये स्वामी समर्थ पेट्रोल पंपा समोर पुणे महानगरपालिका अंगीकृत स्वच्छ संस्थेच्या कचरा संकलन केंद्राला आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली आहे. कचरा संकलन केंद्राचे नुकसान झाले असून या आगीत जीवित हानी झालेली नाही. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमनच्या तीन गाड्या घटनास्थळी ताबडतोब दाखल झाल्या. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024 : आम्ही ५ पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम - प्रफुल्ल पटेल

२८ मार्चला लोकसभेच चित्र स्पष्ट होणार असून २८ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी जाहीर होणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. आम्ही ५ पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम असल्याचेही पटेल म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्पातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाहीये. तसेच जागावाटपाच्या मुद्द्यावर सध्या काही जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे, असेही पटेल यांनी सांगितले.

उज्जैन महाकाल मंदिरात आगीच्या घटनेनंतर PM मोदींची पोस्ट

उज्जैन महाकाल मंदिरात आग लागल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, उज्जैनमधील महाकाल मंदिरातील घटना अत्यंत वेदनादायी आहे. जखमी भाविक लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासन जखमींना शक्य ती सर्व मदत करत आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया

हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणुकीसाठी मंडी येथील भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री, कंगना रणौत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी होळीच्या सर्वांना शुभेच्छा देते . ही माझी 'जन्मभूमी' आहे आणि तिने मला परत बोलावले आहे, मी भाग्यवान आहे... त्यांनी मला निवडले तर मी त्यांची सेवा करेन. मी भारावून गेली आहे, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हा भावनिक दिवस आहे. मी भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांचे मनापासून आभार व्यक्त करते... असे कंगना रणौत म्हणाली.

काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

नैरोबीहून मुंबईला आलेल्या महिलेकडून 19 कोटी 79 लाखांचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 24 मार्च रोजी नैरोबीहून मुंबईला आलेल्या सिएरा लिओन राष्ट्रीयत्वाच्या एका महिला प्रवाशाला CSMI विमानतळावर पकडले. या प्रवाशाकडून 19 कोटी 79 लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली आहे.

उज्जैन महाकाल मंदिरातील जखमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

उज्जैन महाकाल मंदिरात लागलेल्या आगीत १३ जण भाजले आहेत. या दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमधील रुग्णालयात जखमींची भेट घेतली.

सोलापूरची लेक तुमचंही सोलापुरात स्वागत करते..!

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे.

उद्या उबाठाच्या 15-16 जागांची घोषणा होणार

उद्या शिवसेनाच्या 15-16 जागा बद्दल घोषणा होणार असल्याची माहीती संजय राऊत यांनी दिली.

नांदेडच्या गुरुद्वारात होलिकोत्सव सुरू

nanded येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे होळी, धूलिवंदनानिमित्त शनिवारपासून (ता.२३) विविध कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. शनिवार (ता.२३) ते मंगळवार (ता.२६ मार्च) या कालावधीत होळी, धूलिवंदनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत.

होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीणमध्ये पोलीस यंत्रणा अलर्टवर

होळी आणि आज रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीणमध्ये पोलीस यंत्रणा अलर्टवर आले आहे. ग्रामीण भागात महामार्गावर पोलीसांची नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयास्पद वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. बनावट मद्य आणि इतर बेकायदा घटना रोखण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत.

रविवार ठरला अपघातवार! वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

रविवारी सर्वत्र होळीचा उत्साह असताना विदर्भ मात्र तीन अपघातांनी हादरला. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल नऊ जण गतप्राण झाले. यात अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात पती-पत्नीसह एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. दुसरा अपघात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात परतवाडा-धारणी मार्गावर बस दरीत कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. बस झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून, या घटनेत २५ प्रवासी जखमी झाले.

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान लागली आग, पुजाऱ्यासह १३ जण जखमी

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज भस्म आरतीदरम्यान आग लागली. या आगीच्या घटनेच पुजाऱ्यासह १३ जण जखमी झाले आहेत. आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह म्हणाले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत लोक किरकोळ भाजले. कोणीही गंभीर जखमी नाही.

दिल्लीतील अलीपूरमध्ये कारखान्याला भीषण आग

दिल्लीत अलीपूर येथील एका कारखान्याला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियत्रंण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन; पुण्यातील घटना

सासरकडील छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना पुणे शहरातील वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर लोणीकंद पोलिसांनी पतीसह सासू तसेच नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रीती संजय शिंदे असं मृत महिलेचं नाव आहे.

देशभरात निवडणुकांची तयारी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपचा तिढा अजूनही सुटला नाही. भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाली अनेकांना संधी देण्यात आली आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com