Marathi Update News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Prime Minister narendra modi
Prime Minister narendra modi esakal

नरेंद्र मोदी उद्या आसाममध्ये पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला दाखवतील हिरवा झेंडा

गुवाहाटी | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आसाममध्ये ईशान्येकडील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ईशान्येकडील वंदे भारत पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी स्टेशन आणि आसाममधील गुवाहाटी दरम्यान धावेल.

वंचितच्या मुंबई युवक अध्यक्षांवर जिवघेणा हल्ला

मुंबईतील दादर परिसरात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष परमेश्वर रणशूर यांच्यावर चार अज्ञातांनी चाकू आणि रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात पक्षाचे नेते गौतम हराल हेही जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 307, 326 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, मुंबई पोलिसांनी ही माहीती दिली.

30 दहशतवाद्यांचा वेगवेगळ्या भागात खात्मा

अत्याधुनिक शस्त्रे असलेल्या दहशतवादी गटांविरुद्ध प्रति आणि बचावात्मक कारवाईत, सुमारे 30 दहशतवादी वेगवेगळ्या भागात मारले गेले आहेत. काहींना सुरक्षा दलांनी अटकही केली आहे: मणिपूर सरकार

भाजपची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक आहे.

पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या हस्ते 75 रुपयाच्या नाण्याचं अनावरण

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त मोदी सरकारने 75 रुपयाच विशेष नाणं जारी केल आहे. या नाण्यावर भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा प्रवास दाखवला आहे. 

दिल्ली पोलिसांकडून आंदोलक पैलवानांवर कारवाई; जंतर-मंतरवरील तंबू उखडले

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आत ट्विट करून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कुस्तीपटूंना पाठिंबा देण्याची मागणी केली. दिल्लीच्या जंतर मंतरवर भारतीय महिलाकुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. या इमारतीसमोरच भारतीय महिला कुस्तीपटू आंदोलन करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.

केजरीवालांनी घेतली सत्येंद्र जैन यांची भेट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये दिल्लीचे माजी मंत्री आणि आप नेते सत्येंद्र जैन यांची भेट घेतली.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देश अमृत महोत्सव साजरा करत आहे- PM मोदी 

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. आज सकाळी संसद भवन संकुलात सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे. या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. ही केवळ एक इमारत नाही, तर ती 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे, नवीन संसद भवनात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज या ऐतिहासिक प्रसंगी संसदेच्या नवीन इमारतीत काही काळापूर्वी पवित्र सेंगोलची स्थापनाही करण्यात आली आहे. ग्रेट चोल साम्राज्यात, सेंगोल हे कर्तव्याचा मार्ग, सेवेचा मार्ग, राष्ट्राच्या मार्गाचे प्रतीक मानले जात असे. राजा जी आणि अधिनामच्या संतांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनले. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तामिळनाडूतील विशेषत: अधिनाम येथील संतांनी भवनात हजेरी लावली होती

आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा - PM मोदी 

ही नवी वास्तू आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार करण्याचे साधन बनेल. ही नवीन इमारत स्वावलंबी भारताचा सूर्योदय पाहणार आहे. या नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे. नवे पॅटर्न नव्या वाटांवर चालल्यानेच निर्माण होतात. आज नवा भारत नवीन ध्येय निश्चित करत आहे

प्रत्येक देशाच्या विकासाच्या प्रवासात असे काही क्षण येतात जे अजरामर होतात- PM मोदी 

प्रत्येक देशाच्या विकासाच्या प्रवासात असे काही क्षण येतात जे अजरामर होतात. 28 मे हा असा दिवस आहे असं नवीन संसदेत पंतप्रधान मोदी यांनी बोलताना म्हंटलं आहे.

75 रुपयांच्या विशेष नाण्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण 

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे.

नवीन संसदेच्या उद्घाटनप्रंसगी राष्ट्रपतींचा, उपराष्ट्रपतींचा संदेश

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आणि जयदिप धनखड यांचा संदेश राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांना वाचून दाखवला.

PM मोदी संसद भवनाच्या उद्धाटनाला राज्याभिषेक समजतायत – राहुल गांधी

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट केलं आहे. त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या उद्धाटनाला राज्याभिषेक समजत आहेत असं म्हंटलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत नवीन आधुनिक संसदेची निर्मिती

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत नवीन आधुनिक संसदेची निर्मिती झाली ही अत्यंत आनंदाची बाब आहे - नवीन संसदेत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश

नवीन लोकसभेत पंतप्रधान मोदी उपस्थित, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात

नवीन लोकसभेत पंतप्रधान मोदी उपस्थित झाले असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.

नवीन संसद भवनाच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा

नवीन संसद भवनाच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

दिल्लीत कुस्तीपटूंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; जंतरमंतरवर जोरदार गोंधळ

आज दिल्लीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. मात्र या दिवशी नव्या संसद भवनाच्या आवारात आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवला. नवीन संसद भवनाकडे जाणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी अडवलं.

आमची बांधिलकी जुन्या संसदेशीच - शरद पवार 

देशात आताच्या परिस्थितीत जे काही सुरू आहे ते सर्व लोकशाहीच्या विरोधात आहे. संसदेच्या इमारतीबाबत कधीच काही चर्चा झाली नाही. इतका मोठा निर्णय घेताना चर्चा झालेली नाही. आमची बांधिलकी जुन्या संसद इमारतीशीच आहे. संसदेचं निमंत्रण माझ्या हातात आलेलं नाही. विरोधकांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता. देशात जी मूल्य रुजवली त्याला धरून हा कार्यक्रम झाला नसल्याचं शरद पवार म्हणालेत.

महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच सावरकर जयंती साजरी 

महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच सावरकर जयंती साजरी करण्यात येत आहे. यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आज नव्या संसद भवनाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला याला विरोधकांनी विरोध केला यावर बोलताना शिंदे म्हणाले की, विरोधकांनी कार्यक्रमात मिठाचा खडा टाकण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं नाव जगभर कामावल आहे, मोदींच्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे,

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात वीर सावरकरांची जयंती साजरी

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात वीर सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीर सावरकरांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त; अजित पवारांचा दावा

पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. पुण्यातली जागा काँग्रेसला जिंकता आलेली नाही पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी असंही त्यांनी म्हंटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन पार पडलं आहे.

नव्या संसद भवनाच्या बाहेर सर्व-धर्म प्रार्थना, मोदींसह इतर मान्यवरांची उपस्थिती

नव्या संसद भवनाच्या बाहेर सर्व-धर्म प्रार्थना, मोदींसह इतर मान्यवरांची उपस्थिती दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवनाच्या कारागिरांचा सन्मान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवनाच्या कारागिरांचा सन्मान करण्यात आला आहे. हि भव्य दिव्य इमारत बांधण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. त्यांचा सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संसद भवनात राजदंड स्थापित 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संसद भवनात राजदंड स्थापित करण्यात आला आहे. राजदंड लोकसभा सभागृहात स्थपित करण्यात आला आहे.

नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत

नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाचे खासदारही सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

नव्या संसद भवनाच्या पूजेला सुरूवात; PM मोदी यांच्या हस्ते पूजा 

नव्या संसद भवनाच्या पूजेला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा ही पूजा संपन्न होत आहे. या पूजेला ओम बिर्ला देखील उपस्थित आहेत.

PM नरेंद्र मोदी नव्या संसदेत पोहोचले, थोड्याच वेळात उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ मंत्री, 25 राजकीय पक्षांचे सदस्य आणि धार्मिक नेत्यांसह अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हवन व बहुधर्म प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.

आज देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com