
LIVE Update : धान उत्पादकांकरिता CM शिंदेंची मोठी घोषणा, जाहीर केला बोनस
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
TuNisha Sharma Case : आई आणि काकांचा पोलिसांनी नोंदवला जबाब
टीव्ही अभिनेत्री तुनषा शर्मा मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तुनिषाची आई आणि काका यांचा जबाब नोंदवला. यावेळी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करू द्या, संपूर्ण सत्य बाहेर येईल अशी माहिती तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी दिली. वसई येथील वालीव पोलिसांकडून तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांचे आज जबाब नोंदवण्यात आले.
धान उत्पादकांकरिता CM शिंदेंची मोठी घोषणा, जाहीर केला बोनस
सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी 15 हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 5 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी माहिती राज्य विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
तुनिषा शर्माच्या कुटुंबीय पोलिस स्टेशनमध्ये
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात वसई येथील वालीव पोलिसांकडून तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत.
दादा, मला ट्विटरवर फॉलो करा : देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांच्या वीज तोडण्याच्या जीआर दादांना कसा मिळाला नाही? मी ट्वीट केला होता, फेसबुकवर टाकला, सर्वांना पाठवलाही होता, त्यामुळं दादा आता तुम्ही मला ट्विटरवर फॉलो करा, अशी कानपिचक्या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते विरोधी पक्षनेते म्हणून मला फॉलो करतात आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना फॉलो करतो, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागताला १ दिवस उरला असताना, पुण्यात कोट्यवधी रुपयांची दारू जप्त
नवीन वर्षाच्या स्वागताला १ दिवस उरला असताना, पुण्यात कोट्यवधी रुपयांची दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल १ कोटी ७० लाख रुपयाची विदेशी दारू जप्त
याप्रकरणी ७ जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे
या कारवाईत २ ट्रक आणि त्यात तब्बल २००० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त
"थर्टी फर्स्ट" सेलिब्रेशनच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
बीएमसीत राडा सुरूच, ठाकरे गट आक्रमक
मुंबई महापालिकेवरील शिवसेना कार्यालयाचा वाद आज आणखीच पेटला आहे. कार्यालयातील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाच्या पाटीला शिवसैनिकांनी लाल शाई फासली. हे नाव मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कालदेखील ठाकरे गटाने त्यांच्या नावावर चिठ्ठी लावली होती. यामुळे हा वाद आणखी पेटला आहे.
अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला : उद्धव ठाकरे
अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला.
विदर्भासाठी आत्तापर्यंत घोषणा काहीही केली नाही.
सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला काय दिलं?
राज्यातून प्रकल्प पळवले गेले.
आरोप झाल्यानंतर फक्त क्लिनचिट द्यायचं काम करणार का? सरकार नेमकं करतय काय?
पुणे विमानतळावर बाहेरून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह
पुणे विमानतळावर बाहेरून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. तर हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सिंगापूर वरून आल्याची माहिती समोर आली आहे.
रामदास आठवले यांनी मृत अभिनेत्री तुनिषा शर्मा कुटुंबियांची घेतली भेट
रामदास आठवले यांनी मृत अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
मुंबई पालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील; आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ठाकरे शिंदे गटात राजकारण पेटले आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेतेही कार्यालयात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही गटात चांगचाल राडा झाला. दरम्यान, आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.
अजित पवार राजकारणातून बाहेर पडणार?
मी राजकारणातून संन्यास घेतो असंही अजित पवार पुढे म्हणाले आहेत.बबोलताना ते म्हणाले की, मी राजकारणातून संन्यास घेतो बावनकुळे यांच्या इतक्या ताकदीचा नेता माझा करेक्ट कार्यक्रम करणार त्यांच्या आव्हानामुळे मुळे मी घाबरलो असंही अजित पवार उपहासात्मक टीका करत म्हणाले आहेत.
दुखापतींनी त्रस्त ऑस्ट्रेलियासमोर आफ्रिकेने पुन्हा एकदा टाकली नांगी
ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना एक डाव आणि 182 धावांनी जिंकला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू दुखापतींनी हैराण झाले होते, मात्र असे असतानाही दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्याशी टक्कर देऊ शकला नाही.
शाहरूख दीपिकाच्या 'पठाण'मधील गाण्यावर आंटीचा डान्स
सध्या शाहरूख खान आणि दीपिका पादुकोन यांचा पठाण चित्रपट चर्चेत आहे. तर त्यामधील बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने वापरलेल्या बिकीनीवरून सध्या वाद सुरू आहेत. या चित्रपटातील गाणे चाहत्यांना आकर्षित करत असून 'झूमे जो पठाण' या गाण्यावर एका महिलेचा डान्स सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
उध्दवजी,एकांतात दिलेला शब्द...शीतल म्हात्रेचे ट्विट चर्चेत
राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे एक ट्विट चर्चेत आलं आहे. सहा महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. त्याची आठवण करुन देत बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका. असा खोचक सल्ला दिला आहे.
"याच भारताच्या खऱ्या हिरो" त्यांची कहाणी ऐकून अदानींच्या डोळ्यात पाणी
एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. जीवनात प्रेरणा कोठून मिळते असे विचारले असता. त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे अनेक गुण सांगून उत्तर दिले. दोन विलक्षण महिलांचाही उल्लेख केला, ज्यांच्या कथांनी त्यांच्या डोळ्यात पाणी आणले. अरुणिमा सिन्हा आणि किरण कनोजिया यांच्या कथांनी ते खूप प्रभावित झाल्याचे गौतम अदानी यांनी सांगितले. या दोन असाधारण महिला आहेत. ज्यांनी दुर्दैवाने आपले हातपाय गमावले, परंतु तरीही जग जिंकले.
पुण्यात 'मुळशी पॅटर्न' कायम? कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याची दहशत
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. अशाच एका भयानक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेच्या व्हिडीओमुळे मुळशी पॅटर्न चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही
'लस्ट स्टोरीज' मधील इंटिमेट सीन देताना घाबरली होती भूमी; म्हणाली,'माझ्या अंगावरील कपडे..'
Jio 5G: जिओचे नववर्षाचे गिफ्ट! महाराष्ट्रातील 'या' शहरांसह ११ ठिकाणी ५जी सेवा सुरू; मोफत मिळेल हाय-स्पीड इंटरनेट
“वेड्या लोकांचा प्रमुख वेडा, ठाकरेगट म्हणजे दोस्ताना पार्ट 3!”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
राहुल गांधींना ट्रोल केल्याने भाजप नेत्यावर उर्फी जावेद भडकली
टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. मात्र, सध्या ती एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. नेहमी तिला तिच्या कपड्यावरुन ट्रोल केलं जात. अशातच, एका भाजप नेत्याने राहुल गांधींची तुलना थेट तिच्याची केल्याने ती भलतीच भडकली आहे. तिने ट्विट करत चांगलाच समाचार घेतला आहे.
अजित पवार राजकारणातून बाहेर पडणार?
हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली होती. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना आव्हान दिलं होतं की, बारामतीमध्ये जाऊन मी राष्ट्रवादीला हरवून दाखवेन जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, शिवसेनेचा केला तसा राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करेन असं ते म्हणाले होते. त्यावर अजित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले की, बावनकुळे यांच्या आव्हानामुळे मला झोप लागत नाही अशी उपहासात्मक टीका केली आहे.
पवार कुटुंबाच्या सीबीआय चौकशीची मागणी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी सीबीआयमार्फत कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे पवार कुटुंबियांच्या अडचणी वाढू शकतात.
मुंबई पालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ठाकरे शिंदे गटात राजकारण पेटले आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेतेही कार्यालयात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही गटात चांगचाल राडा झाला. दरम्यान, आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.