Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर... | LIVE Marathi News Updates | Maharashtra live blog updates 3 June politics sports traffic railway weather crime accident Marathi news srk94 ask97 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi News Live Update

Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशा दौरा करणार

ओडिशा रेल्वे अपघातातील जखमींना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय मदतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया उद्या एम्स भुवनेश्वर आणि कटक येथील वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत, अशी माहिती ANI ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

बचावकार्य जवळपास पूर्ण, शेवटच्या बोगीचे काम सुरू

बचावकार्य जवळपास पूर्ण झाले आहे. शेवटच्या बोगीचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 288 च्या आसपास आहे. 800 जखमींवर उपचार सुरू आहेत: ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना, भुवनेश्वर

रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर, 747 जखमी तर 56 गंभीर ; भारतीय रेल्वेची माहिती

आज दुपारी 2 वाजेपर्यंत आडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे, तर 747 लोक जखमी झाले आहेत आणि 56 गंभीर जखमी आहेत- भारतीय रेल्वे

समीर वानखेडे आणि क्रांती यांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र | मुंबई एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. ही धमकी मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

रेल्वे अपघातातील जखमींना भेटण्यासाठी नरेंद्र मोदी रुग्णालयात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोर रेल्वे अपघातातील जखमींची बालासोर येथील रुग्णालयात भेट घेतली.

Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोरमध्ये दाखल

राजकारणात कधी कधी किर्तनही करावं लागतं- पंकजा मुंडे

राजकारणात कधी कधी किर्तनही करावं लागतं असं पंकजा मुंडे यांनी बोलताना म्हंटलं आहे.

रामायण, महाभारतातील दाखले आवडतात

प. बंगाल सरकारकडून पीडितांना मदत जाहीर 

पश्चिम बंगाल सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि राज्यातील पीडितांना प्रत्येकी 50,000 रुपये देण्याची घोषणा

एकनाथ खडसेंनी घेतली पंकजांची भेट; बंद दाराआड चर्चा

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तासापासून बंद दाराआड चर्चा झाली आहे. एकनाथ खडसे यांनी आज पंकजा मुंडे यांची त्यांच्या यशश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत रोहिणी खडसे आणि प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थित होत्या.

पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल

पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झाल्या आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमीत्ताने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिसातील रेल्वे अपघातस्थळी भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिसातील रेल्वे अपघातस्थळी भेट देणार आहेत. या ठिकाणी पंतप्रधान मोदी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाला जाणार आहेत. प्रथम ते बालासोर येथील अपघातस्थळाला भेट देतील आणि त्यानंतर कटक येथील रुग्णालयाला भेट देतील

धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाली पलटी

धाराशिवमध्ये बस पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये 26 जण जखमी झाले आहेत. तर या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी परांडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर चालक गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. चालकाचा बसवरील ताब सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेत २३८ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी

कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २३८ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम रद्द

मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा आज होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे होणार होता. कार्यक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली होती.

आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 14 तासांचा विशेष ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी–गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर आज (शनिवारी) रात्री 12 वाजल्यापासून रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर