LIVE Update: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIVE Update: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त

पुणे मनसेकडून दारूच्या दुकानांसमोर दुधवाटप

Live

LIVE Update: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

03:41 PM,  Dec 31 2022

मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त

मुंबईतील सर्व प्रमुख गर्दीच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहन चालवणे आणि रॅश ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी शहरातील 100 पॉईंट्सवर पोलिस पिकेट्स स्थापन करण्यात आल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी फिरते पोलिस पथके आणि साध्या वेशातील पोलिस कर्मचारीही तैनात.

पुणे मनसेकडून दारूच्या दुकानांसमोर दुधवाटप.

‘दारू नको दुध प्या’ चे मनसेकडून आवाहन.

पुण्यातील विविध भागात दारुदुकानांसमोर मससैनिकांनी वाटले दुध.

दारू विक्रेत्यांना देखील दुधाचे वाटप.

02:17 PM,  Dec 31 2022

धक्कादायक; पुण्यात यावर्षी तब्बल 305 अपघात तर 311 जणांचा मृत्यू

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार. यावर्षी पुण्यात तब्बल 305 अपघात झाले तर या अपघातात 311 जणांचा मृत्यू झाला आहे.

12:16 PM,  Dec 31 2022

रक्षकच बनले भक्षक! मुंबईत मुलीचा पोलिसाकडून विनयभंग

मुलासोबत बोलत असताना पामबीचवर पोलिसाने आयआयटीमधील तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी नवी मुंबई ,सानपाडा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

10:48 AM,  Dec 31 2022

अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट; शिंदे गटातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट

अमच्या पक्षातील नेतेच  माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानाने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे. 

10:05 AM,  Dec 31 2022

माजी पोप बेनेडिक्ट सोळावा यांचे ९५ ​​व्या वर्षी निधन

माजी पोप बेनेडिक्ट सोळावा यांचे ९५ ​​व्या वर्षी निधन: व्हॅटिकन

08:49 AM,  Dec 31 2022

मुंबईमध्ये पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहेत. पोलिस कंट्रोल रूमला फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.

08:18 AM,  Dec 31 2022

भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह

सातारा : साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. वाढे इथं मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडालीये. भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलावडे (Kantatai Nalawade) यांच्या बंद असलेल्या बंगल्याच्या परिसरात हा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. सातारा तालुका पोलीस (Satara Taluka Police) रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. मृतदेहाबद्दल माहिती घेण्याचं काम सुरू होतं.

07:57 AM,  Dec 31 2022

ऋषभ पंतचा मेंदू, पाठीचा कण्याचा एमआरआय रिपोर्ट नॉर्मल

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे एका भीषण अपघातात झाला. पंत उत्तराखंडमधील रुरकी या त्यांच्या मूळ गावी जात असताना त्यांची कार मंगलोरजवळ दुभाजकाला धडकली. पंत स्वतः कार चालवत होता. सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या अनेक तपासण्याही येथे झाल्या आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले आहे. ज्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामुळे चाहत्यांना आणि खुद्द पंतला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहे.


07:57 AM,  Dec 31 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला 

केंद्रीय मंत्री नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांच्या

07:24 AM,  Dec 31 2022

चिपळूण गुहाघर येथे रिक्षा आणि चारचाकी गाडीचा अपघात

चिपळूण गुहाघर येथे रिक्षा आणि चारचाकी गाडीचा अपघात झाला

दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

रिक्षातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

06:57 AM,  Dec 31 2022

'मेटेंचं कार्य पुढे नेण्यासाठी आमचा पाठिंबा' फडणविसांनी ज्योती मेटेंना दिलं आश्वासन

आज शिवसंग्रामचा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर गेले होते. विनायक मेटे यांनी 2015 साली ही संकल्पना मांडली आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर या व्यसनमुक्ती जनजागृती संकल्पनेत खंड पडू नये म्हणून त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी हा कार्यक्रम सुरू ठेवला आहे.


05:29 AM,  Dec 31 2022

सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम; शरद पवार यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केलीय.

03:36 AM,  Dec 31 2022

पंतची प्लास्टिक सर्जरी, डोके अन् मणक्याचा MRI आला समोर

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे एका भीषण अपघातात झाला. पंत उत्तराखंडमधील रुरकी या त्यांच्या मूळ गावी जात असताना त्यांची कार मंगलोरजवळ दुभाजकाला धडकली. पंत स्वतः कार चालवत होता. सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या अनेक तपासण्याही येथे झाल्या आहेत.

02:42 AM,  Dec 31 2022

घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटून रस्त्याला नदीचे स्वरूप, स्थानिकांचे मोठे नुकसान

घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले. यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे.

02:42 AM,  Dec 31 2022

सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; अपघातात 24 मुली किरकोळ जखमी

सहलीसाठी औंरगाबाद, शिर्डीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला. या अपघातामध्ये 24 मुली किरकोळ जखमी झाल्यात. इचकरंजीतील सागर क्लासेसची आठ ते दहा मुलींची सहल औरंगाबाद आणि शिर्डीला गेली होती. शिर्डी येथून परत इचलकरंजी येथे जाताना बारामती जवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ व 3 मुली गंभीर जखमी झाल्या. जखमीवर बारामतीतील महिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.