दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्
sakal breaking notifiction
sakal breaking notifictionesakal

२४ वर्षीय तरुणीला विवस्त्र करुन मारहाण

प्रेमप्रकरणातून तरुणीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. २४ वर्षीय तरुणीला विवस्त्र करून व्हिडिओ काढून सोशल मीडिया वर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी केला गुन्हा दाखल करण्यात आलाय.

8 लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागातल्या अधिकाऱ्याला पकडलं

औरंगाबाद विभागातल्या जलसंधारण खात्यात हा प्रकार घडला आहे. १ कोटी ३७ लाख रुपयांच्या कामासाठी साडेसात टक्के लाच मागितली गेली. त्यापोटी ८ लाख रुपये घेताना जलसंधारण विभागतल्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं आहे.

तुर्कीला भूकंपाचा तिसरा धक्का

तुर्की आणि परिसरामध्ये आज सकाळी जवळपास ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. काही वेळापूर्वी भूकंपाचा तिसरा धक्का बसला आहे. आतापर्यंत दीड हजारांहून जास्त लोकांचा या घटनेत मृत्यू झालाय.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार टिळक कुटुंबीयांची भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार टिळक कुटुंबीयांची भेट.

थोड्याच वेळात बावनकुळे केसरी वाड्यात जाणार.

टिळक कुटुंबीयांबाहेरील उमेदवार दिल्याने सध्या टिळक कुटुंबीय भाजपवर आहे नाराज आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या पदयात्रेतही शैलेश टिळक अनुपस्थित होते.

ब्राह्मण समाजावर अन्याय होत असल्याची टीका सध्या भाजपवर होत आहे. याच पार्श्वभूमीवर टिळक कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे भेट घेणार आहेत.

तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये आज झालेल्या भूकंपात १३०० लोकांचा मृत्यू

तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये आज झालेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपात मृतांची संख्या १३०० झाली आहे. अजूनही ही अनेक लोक अडकले आहेत, तर मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यात आहे..

तुर्की येथे झालेल्या भुकंपात १ हजारहून अधिक जणांचा मृत्यू

तुर्की येथे झालेल्या भुकंपामध्ये १ हजार ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ६ हजार ४०० जण जखमी झाले आहेत.

कसबा पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेडची उडी

कसबा पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेडनेदेखील उडी घेतली आहे. नेते अविनाश मोहिते उद्या अर्ज भरणार आहेत.

हेमंत रासने यांनी भरला कसबा पोटनिवडणुकीसाठी अर्ज

हेमंत रासने यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत अर्ज भरला आहे. पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन करत हेमंत रासने यांनी अर्ज भरला आहे. सकाळी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती केल्यानंतर रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती केली आणि त्यानंतर अर्ज भरला.

पुण्यात काँग्रेस पक्षाच आंदोलनं

अदानी समूहातील गौर व्यवहारा प्रकरणी काँग्रेस आज देशभर आंदोलन करत आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात असलेल्या एलआयसी कार्यालयासमोर आंदोलनं सूरु आहे. आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदी नेते उपस्थित आहेत.

अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी

अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी. त्या प्रकरणी आंदोलन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर भाजपचे आंदोलन 

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती केल्यानंतर धंगेकर अर्ज भरणार

कसबा विधानसभा पोटनिवडणूक निमित्त उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर आज अर्ज भरणार आहेत. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती ची आरती केल्यानंतर धंगेकर अर्ज भरणार आहेत. कसबा गणपती समोर काँग्रेस चे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी दाखल झाले आहेत. काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे देखील राहणार उपस्थित असणार आहेत.

भाजपमध्ये नाराजीची भाषा चालत नाही -हेमंत रासने

गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून भाजपचं काम करीत आहे. आमदारकीची संधी आत्ता मिळाली आहे. गेल्या वेळेस उमेदवारी मागितली होती परंतु मुक्ता टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिल्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. भाजपमध्ये नाराजीची भाषा चालत नाही. हा शिस्तबद्ध पक्ष आहे. विरोधात कोणीही असो कसाही प्रचार करो... भाजप आणि मित्र पक्षांच्या बाळावर विजय मिळवणारच - हेमंत रासने, भाजप उमेदवार, कसबा विधानसभा मतदार, पुणे

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करून दोन्ही उमेदवार आज अर्ज भरणार 

कसबा विधानसभा पोटनिवडणूक निमित्त उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करून अर्ज भरण्यात येणार आहे. भाजपकडून हेमंत रासने तर महविकास आघाडी कडून रवींद्र धंगेकर हे दोन्ही उमेदवार आज अर्ज भरणार आहेत. कसबा गणपती समोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हेमंत रासने यांच्या पाठिंब्यासाठी भाजप कडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित आहेत.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली आहे. मुक्ता टिळक यांना अभिवादन करण्यासाठी ते केसरीवाड्यात गेले आहेत. भाजपने टिळक परिवाराला उमेदवारी नाकारल्यानंतर धंगेकर टिळकांच्या भेटीला गेले आहेत. धंगेकर यांनी घेतली रोहित टिळक यांची देखील भेट घेतली आहे.

कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरणार

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूका पार पडणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज भाजपकडून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबरोबरच काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नाव जाहीर करण्यात आलं असुन ते आज उमेदवार अर्ज भरणार आहे. राष्ट्रवादीने अद्याप चिंचवडसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र राष्ट्रवादीकडून राहुल कलाटेचं नाव आघाडीवर आहे.

पोस्टरवर काय लिहीलंय?

या पोस्टरवरती "कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का...??? समाज कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरूक उमेदवार" असा मजकूर लिहण्यात आलेला आहे. हे फ्लेक्स पुणे शहरातील काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. दरम्यान हा फ्लेक्स नेमका कोणी लावला? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?, कसबापेठेत लागले बॅनर्स

पुण्यातील विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान शहरात 'कुलकर्णी, टिळकांनंतर आता नंबर बापटांचा का... ?' असा प्रश्न विचारणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अखेर ठरलं! कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर

कसबा पेठेतून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी कॉंग्रेसचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता कसबा गणपती व दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन कॉंग्रेसचा उमेदवार अर्ज भरण्यास जाणार असल्याचे शहर कॉंग्रेसच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com