दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
LIVE Update :
LIVE Update :

एकनाथ शिंदे छोटी आव्हाने स्विकारत नाही

काही लोक आव्हानं देतात पण हा एकनाथ शिंदे छोटी आव्हानं स्विकारत नाही, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन निवडणुकीला सामोर जाण्याचे आव्हान दिलं होतं.

मागच्या सरकारला सामान्यांच्या प्रश्नांचं देणंघेणं नव्हतं - एकनाथ शिंदे

कोळी बांधवांचा कोस्टल रोडला विरोध नव्हता. फक्त दोन पिलरमध्ये अंतर वाढवण्याची मागणी होती. पूर्वी ६० फूट अंतराने काम होणार होतं. परंतु बोटींना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हे अंतर १२० फूट ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. मागच्या सरकारला सामान्यांच्या प्रश्नांचं देणंघेणं नव्हतं म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आमचं सरकार जनतेच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार, असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.

मी सुद्धा मासेविक्री केली - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की, कोळी समाज हा जीवाला जीव देणारा आहे. समुद्रांच्या लाटांशी सामना करणारा कोळी समाज हा इथला मूळनिवासी आहे. मी कोळी नसलो तरी या व्यवसायाशी माझं जवळचं नातं आहे. मी मासेविक्रीचा व्यवसाय पूर्वी केलेला आहे.

वरळीत मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, आदित्य ठाकरेंचे चॅलेंज स्विकारणार?

आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या समारंभाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ!

औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेदरम्यान गोंधळ उडाला आहे. शिवसंवाद यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी निघाल्याने हा गोंधळ उडाला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्वांना शांत राहण्याची विनंती केली.

उद्या साडेबारा वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

उद्धव ठाकरे उद्या साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे.

तुर्कीला मदत करण्यासाठी जगाने पुढे केला मदतीचा हात 

तुर्कस्तानमध्ये मदत करण्यासाठी इतर देशांमधून 3,000 कर्मचारी गेले आहेत. तुर्कस्तानमधील विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी भारताने दोन विमानांद्वारे मदत सामग्री आणि वैद्यकीय पथके पाठवली आहेत. या भूकंपात आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी संपला

विधानसभेच्या कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी संपला आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी वेळ देण्यात आली होती. 

अदानींचे पंतप्रधानांसोबत नातं काय? ; राहुल गांधींचा सभागृहात थेट सवाल

लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे एकत्र फोटो दाखवला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय असा थेट सवाल केला.

तुर्की -सीरियामध्ये भूकंपातील मृतांची संख्या ४,९०० वर, शोध सुरू...

तुर्कस्तानमध्ये भुकंपाचा ५ वा धक्का जाणवला आहे. ढिगाऱ्याखाली मृतदेहांचा शोध सुरु आहे. आतापर्यंत ४९०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सत्यजित तांबे यांना ऑफर दिली नाही- भाजप प्रदेशाध्यक्ष

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्ट वक्तव्य केलं आहे. सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास दरवाजे खुले असल्याचं बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. नाना पटोले-थोरात वादावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेतृत्वाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल घेतली असून प्रभारी एच के पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवले असून बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. थोरातांची समजूत काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर सुधीर तांबे यांची प्रतिक्रिया 

व्यथित होणारी गोष्ट आहे. बाळासाहेब काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या नेत्यानी आणि हायकमांड यांनी विचार करायला हवा.

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! बाळासाहेब थोरात यांचा गटनेते पदाचा राजीनामा

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! बाळासाहेब थोरात यांचा गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते अशी चर्चा सुरू होते इतक्यात त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सहानुभूती आणि राजकारण वेगळं आहे; आम्ही निवडणूक लढवणार- नाना काटे

चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवारी जाहिर केली आहे. मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यांनतर नाना काटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. लक्ष्मण जगताप यांच्याबाबत विचारले असता त्यांनी सहानुभूती आणि राजकारण वेगळं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

चिंचवड पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे.

पक्षाने नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा बिनविरोध होईल अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध केली नाही.

ब्राम्हण, हिंदू महासंघाची पोटनिवडणुकीत एन्ट्री; आनंद दवे उमेदवारी दाखल करणार अर्ज

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपने ब्राम्हण उमेदवार न दिल्याने ब्राम्हण आणि हिंदू महासंघाने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद दवे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकास दुपारी दीड वाजता अभिवादन करून अर्ज दाखल करणार आहेत.

कसबा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर निवडणूक अर्ज दाखल करणार

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. मोदी गणपतीपासून सकाळी दहा वाजता बाईक रॅली सुरू होणार असून जोरदार शक्तीप्रदर्शन करत बाळासाहेब दाभेकर आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.

आज अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री कियारा अडवाणी विवाहबंधनात अडकणार

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थान येथील जैसलमेरमध्ये दोघांच लग्न होणार आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

चिंचवड, कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही कोणाचचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनाही इच्छुक होती. राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे. पण उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com