दिवसभरात देशात अन् राज्यात काय घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

दिवसभरात देशात अन् राज्यात काय घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर

 संजय राऊत भांडूपमधील घरी पोहचले, कार्यकर्त्यांकडून जल्लोष

संजय राऊत हे त्यांच्या भांडूपमधील घरी पोहचले आहेत, यावेळी कार्यकर्त्यांकडून मोठ्या जल्लोषात त्यांचं घरी स्वगत करण्यात आलं. यावेळी बोलताना उद्यापासून कामाला लागणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर

सिध्दिविनायक मंदीरात दर्शन घेतल्यानंतर राऊत आता शिवाजी पार्क येथिल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर पोहचले आहेत.

 तुरुंगातून बाहेर आल्यावर राऊत सिध्दिविनायक मंदीरात

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय राऊत हे सिध्दिविनायक मंदीरात दर्शनासाठी पोहचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे.

 अखेर संजय राऊत तुरुंगातून बाहेर

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांची पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे.. कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. दरम्यान संजय राऊत यांच्याकडून कार्यकर्त्यांसोबत रॅली काढण्यात येत आहे.

संजय राऊत थोड्याच वेळात येणार तुरुंगातून बाहेर

संजय राऊत यांची आजच सुटका होणर असून ते थोड्याच वेळात तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्थररोड तुरुंगाच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे तुरुंगाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांच्या घरापर्यंत ५०० बाईक घेऊन रॅली काढण्यात येणार आहे.

संजय राऊत तुरुंगातून सुटल्यानंतर रुग्णालयात दाखल होणार

संजय राऊत यांची प्रकृती ठीक नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर, उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आणि इतर काही ठिकाणी भेटी घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली.

संजय राऊत यांना कोर्टाने जामीन दिल्यानंतर सैनिकांकडून जल्लोष

पुण्यातील शिवसेना भवन येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून तसेच एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, संजय मोरे यासह अनेक शिवसैनिक होते उपस्थित होते.

संजय राऊतांना मोठा दिलासा; जामीनावर हायकोर्टाने स्थगिती देण्यावर नकार

संजय राऊतांना मोठा दिलासा; जामीनावर हायकोर्टाने स्थगिती देण्यावर नकार दिला आहे. हायकोर्टाने युक्तीवाद केला आहे की ,तातडीने निर्णय देणे चुकीचं ठरेल.

राऊतांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी सुरू

राऊतांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळं आजून पर्यंत राऊत बाहेर येणार का नाही यावर स्पष्टता नाही.

सुटका झाल्यावर राऊत मातोश्रीवर जाण्याची शक्यता 

संजय राऊत यांच्या जामीनावरील अर्जाची सुनावणी पार पडली. ते आता ऑर्थर रोड जेलमध्ये गेले आहेत. त्यांची राहिलेली जामीनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.

संजय राऊत यांच्या जमीन अर्जाची मागणी फेटाळली; सुटकेचा मार्ग मोकळा 

अखेर आज शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ईडी कोर्टाने बुधवारी जामीन मंजूर केला. संजय राऊत यांच्या जमीन अर्जाची मागणी फेटाळली असून राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया 

मी न्यायदेवतेचे आभार मानतो असं ते म्हणालेत. तर मी लढत राहील असंही ते म्हणालेत.

संजय राऊत यांना जमीन अर्जावर भास्कर जाधव भावुक 

संजय राऊत यांना जमीन मिळाला आहे त्यावर भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, राऊत यांनी तुरुंगात असताना मलाही पत्र लिहल होतं. आज मला खूप आनंद झाला आहे. संजय राऊत लढवय्ये नेते आहेत.

संजय राऊत लढवय्ये नेते म्हणत सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यासारख्या आमच्या अनेक सहकाऱ्यांना अटक केली होती. त्यांना आता जामीन मिळतोय. आमच्या नेत्यांनी गेल्या अनेक दशकांपासून ते लोकांची सेवा करत आहेत त्यांनी लवकर बाहेर येऊन कामाला सुरुवात करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टायगर इज बॅक! राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारेंना अश्रू अनावर

अखेर आज शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ईडी कोर्टाने बुधवारी जामीन मंजूर केला. या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सुषमा अंधारे यांनी 'टायगर इज बॅक' असे म्हटले आहे.

राऊतांना जामीन मंजूर; मात्र चर्चा राहीत पवारांच्या ट्विटची

संजय राऊत यांच्या जामीनावरील स्थगितीबाबत 3 वाजता निर्णय

आज संध्याकाळपर्यंत संजय राऊत बाहेर येण्याची शक्यता आहे. तर संजय राऊत यांच्या जामिनावर ईडी हायकोर्टात जाणार आहे. तर संजय राऊत यांच्या जामिनावर ईडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे. विशेष पीएमपीएल कोर्टाकडून खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर केला आहे. दरम्यान त्यांना संजय राऊत यांच्या जामीनाबाबत ईडी हायकोर्टात जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

अखेर संजय राऊतांना जामीन मंजूर

अखेर संजय राऊतांना १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे.

दीपली सय्यद लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार

दीपली सय्यद पक्षप्रवेश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्या गेल्या आहेत. येत्या 3 दिवसात अभिनेत्री दीपली सय्यद पक्षात प्रवेश करणार आहेत. त्या बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती घेण्यासाठी मी तयार आहे असंही दीपली सय्यद म्हणाल्या.

हर हर महादेव चित्रपटाचे शो चालू करा, मनसे चा पुण्यातील थिएटरवर धडक मोर्चा

हर हर महादेव चित्रपटाचे शो चालू करा, मनसे चा पुण्यातील थिएटरवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूड मध्ये असलेल्या सिटी प्राईड थिएटर मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन जोरदार केले. चित्रपटाला सेन्सॉर ची मान्यता आहे तर शो रद्द करण्याचे कारण काय आहे. चित्रपट चालू झालाच पाहिजे यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यातील मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट थिएटर मध्ये दाखल झाले आहेत.

संजय राऊतांच्या जामीनाचा फैसला; बेल की पुन्हा जेल?

गेल्या 100 दिवसांपासून पत्राचाळ घोटाळ्यात अटकेत असणारे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात दगडफेक

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात दगडफेक करण्यात आली आहे. ही दगडफेक जुने कैदी आणि नवीन कैद्याता झाली, एकमेकांवर तुफान दगडफेक झाली आहे.

दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदारांला कैद्याच्या जमावाने केली मारहाण केली आहे. ही दगडफेक कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बरेक नंबर २७ ते ३१ या बॅरिक जवळ झाली.

जस्टीस चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. 

मध्य रेल्वे नंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

अंधेरी आणि जोगेश्वरी या दोन स्थानकाच्या दरम्यान सिग्नल यंत्रनेत बिगाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन्ही मार्गांवरच्या लोकल गाड्या रखडल्या आहेत. सकाळी 8.30 वाजल्यापासून पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्याच्या मार्गांवर, सकाळी 20 मिनिटं उशिरा असणारी लोकल सध्या 5 ते 10 मिनिटं उशिरा

50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकणार, शिंदे गटाचा इशारा

राज्याच्या राजकारणात 50 खोक्यांवरून सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिलाय. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती आज देणार शपथ

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे भारताचे नवे सरन्यायाधीश असणार आहेत. आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहेत. CSMT कडे येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर