
मणिपूरमध्ये भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे यांच्यावर आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शरद पवारांच्या निवृत्ती मागे घेण्याच्या निर्णयानंतर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. ते म्हणाले की, मी नॉट रिचेबल नाही. अजित पवार हे मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर केली.
पत्रकार परिषदेसाठी शरद पवार वाय.बी. सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.
मुंबईतल्या वाय.बी. सेंटरबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. थोड्याच वेळात शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव सुरु केला आहे.
जम्मू काश्मीर येथे सुरु असलेल्या चकमकीमध्ये पाच जवान शहीद झाले आहेत. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद आहे. त्यांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयावर ते भूमिका घेतात, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
ढाकाहून काठमांडूला जाणारे विमान बांगलादेशचे विमान ३७१ तांत्रिक बिघाडामुळे बिहारमधील पाटणा येथे वळवण्यात आले. विमानातील सर्व ७७ प्रवासी सुरक्षित आहेत, नागरी विमान वाहतूक महासंचालकाने ही माहिती दिली.
उद्या राज ठाकरेंची रत्नागिरीत जाहीर सभा आहे. अमित ठाकरे ट्रेनमधून रत्नागिरीत दाखल झाले आहेत
प्रफुल्ल पटेल यांनी सिल्व्हर ओकवरील बैठक संपली असल्यीच माहिती दिली. या भेटीदरम्यान शरद पवार यांना ठराव दिला. त्यानंतर शरद पवार यांनी निवड समितीकडं विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. पवार आता समितीच्या निर्णयावर विचार करणार अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. समितीने समितीने घेतलेल्या निर्यणांची ते शरद पवार यांनी माहिती देणार आहेत.
समितीच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे शरद पवारच अध्यक्ष राहतील असं पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रिय अध्यक्ष पदावर राहवे ..त्यांचा निर्णय मागे घ्यावा हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला.
शरद पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली, कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस देखील सतर्क झाले आहेत.
शरद पवार निवड समितीच्या बैठकित उपस्थित राहणार नाहीत. ते वाय बी सेंटर येथे उपस्थित राहणार आहेत. थोडावेळात ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकित दोन प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत.
अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पोहचले आहेत. थोडावेळात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय होणार आहे.
अजित पवार मुंबई प्रदेश कार्यालयावर दाखल झाले. यावेळी शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
उद्धव ठाकरे उद्या बारसूला जाणार आहेत. मात्र रत्नागिरी पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाकडून रानतळे गावात सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव आज बैठकीत येणार. प्रफुल पटेल ठेवणार प्रस्ताव आज 16 सदस्यांची सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहणार की नवीन नाव घोषित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस झाले आहेत. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यामुळे आज समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच राज्यात हवामान विभागाने दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.