दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

काल देशभरात रामनवमीचा उत्साह सुरू असतानाच महाराष्ट्रातील छ. संभाजीनगरमध्ये आणि गुजरात, तसंच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार पहायला मिळाला.
Breaking News
Breaking News Sakal

छत्रपती संभाजी नगर येथील दंगलीप्रकरणी एसआयटीची स्थापना

छत्रपती संभाजी नगर येथील दंगलीप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. परवा रात्री शहरात दोन गटात भांडणं होऊन दंगल झाली होती. या प्रकरणी चारशे ते पाचशे जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

खासदार सुप्रिया सुळे यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. लोकसभेत सुप्रिया सुळे आणि गिरीश बापट यांनी एकत्र काम केले. बापट यांच्या निधनानंतर आज सुळे यांनी बापट यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

  • गिरीश बापट साहेब यांना अमच्यावतीने मनापासून आदरांजली

  • थोड्याच काळ ते लोकसभेत होते पण तेव्हाही ते सगळ्यांशी मिसळून होते

  • बापट साहेब आमच्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक होते. अनेक बैठकीत गप्पा गोष्टी होत असत

  • वेगळ्या पक्षाचे असलो तरी महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्र आलो होतो

मनीष सिसोदिया यांना दिल्ली कोर्टाने जामीन नाकारला

दिल्लीतील कथित दारु घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांचा जामीन दिल्ली न्यायालयाने नाकारला आहे. सीबीआयने केलेल्या कारवाई प्रकरणात आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे अटकेत आहेत.

"लई मस्ती आली का?" भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकी

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले गणेश बिडकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. अनोळखी नंबर वरुन धमकी देत त्यांच्याकडं खंडणी मागण्यात आली आहे. गणेश बिडकर यांनी या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरातमध्ये झळकले 'मोदी हटाव’चे पोस्टर; आठ जणांना अटक

गुजरातमधील अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ असे पोस्टर्स झळकले होते. या पोस्टर्सवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आठ जणांना अटक केली. अहमदाबादच्या विविध भागात ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ पोस्टर्स लावल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात देशव्यापी पोस्टर मोहीम सुरू केल्याच्या एका दिवसानंतर ही अटक करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या पथकाकडून मुख्यमंत्री बोम्मईंच्या गाडीची झाडा-झडती

भारतीय निवडणूक आयोगानं (Election Commission of India) बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Election) तारीख जाहीर केली. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाकडून नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. एवढंच नाही तर आज (शुक्रवार) आयोगाच्या भरारी पथकानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांची गाडी अडवून झडती घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दोड्डबल्लापूर येथील श्री घाटी सुब्रमण्य मंदिरात जात असताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं त्यांच्या कारची झडती घेतली आणि चौकशी केली.

मोदींच्या डिग्री सर्टिफिकेटबाबत गुजरात HC चा मोठा निर्णय

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. तसेच पंतप्रधानांच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागवणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

..तर महाविकास आघाडीची सभा रोखली जाणार; गिरीश महाजनांचा इशारा

महाविकास आघाडीच्या सभेमुळं वातावरण बिघडेल गोंधळ होईल, असा रिपोर्ट पोलिसांनी दिल्यास सरकार सभा थांबवेल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसा निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री यावरती लक्ष ठेऊन आहेत, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

इंदूरमधील दुर्घटना प्रकरणात मंदिर प्रशासनावर गुन्हा दाखल; मृतांची संख्‍या 35 वर

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गुरुवारी (दि. ३०) रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली. शहरातील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने भाविक पाण्‍यात पडले. यामधील मृतांची संख्या ३५ वर पोहचली आहे. या प्रकरणात मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आल्याचे इंदूर पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.

रामनवमी उत्सवादरम्यान मशिदीबाहेर मोठा हिंसाचार; 4 जणांना भोसकलं

काल (गुरुवार) देशभरात रामनवमी (Ram Navami) उत्साहात साजरी करण्यात आली. पण, कर्नाटकात मोठा जातीय हिंसाचार उसळला होता. कर्नाटकातील हसन शहरात (Karnataka Hassan) रामनवमीच्या मिरवणुकीत मशिदीबाहेर दोन गटांत हिंसक हाणामारी झाली. यावेळी झालेल्या चाकूहल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी यातील तिघांची ओळख मुरली, हर्ष आणि राखी अशी सांगितली आहे. पोलीस म्हणाले, दोन हल्लेखोर मिरवणुकीत घुसले आणि त्यांनी चाकू चालवण्यास सुरुवात केली. यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. चन्नारायपटनाजवळ ही घटना घडली आहे.

अजित पवारांनी घेतली गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट

खासदार गिरीश बापट यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. मी नाशिकमध्ये होतो, म्हणून मला येता आलं नाही. आज मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा दंगलीत एकाचा मृत्यू, 7 अटकेत

छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा येथील राम मंदिरासमोरील दंगलीत जखमी झालेल्या एकाचा काल (गुरुवार) रात्री मृत्यू झाला. दरम्यान, ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगेखोरांना पकडण्यासाठी स्थापन केलेल्या पोलिस पथकांनी सातजणांना अटक केली आहे. दरम्या‍न या घटनेतील शेख मुनिरुद्दिन मोईनुद्दीन (वय 54, रा. किराडपुरा) असे मृताचे नाव आहे.

संभाजीनगरमधील ओहर गावात दगडफेक; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या ओहर गावात शहरातील घटनेचे पडसाद उमटले आहे. सकाळपासूनच गावात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शहरात बुधवारी रात्री किराडपुरा भागात दंगल घडली. या घटनेत पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. शहरातील परिस्थिती नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र या घटनेनंतर कुठेही अनुचित प्रकार घडू म्हणून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पन्हाळा : वाघबीळ तिठ्यावर पाण्यानं भरलेला टँकर दरीत घरसला

पन्हाळा : येथील एका निवासी शाळेला पिण्याचे पाणी पुरवठा करणारा टँकर रिव्हर्समध्ये गेल्याने वाघबिळ तिठ्याच्या दरीत घसरला. यावेळी चालक टँकर मध्ये नसल्याने तो बचावला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

छत्रपती संभाजीनगरात सभा होऊ नये म्हणून कारस्थान; संजय राऊतांचा आरोप

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? असा सवाल शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. ही सभा होऊ नये म्हणून कारस्थान केलं जात असल्याचा आरोप राऊतांनी केला.

वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांचा विरोध; संयोगिताराजे संतापल्या

छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांनी विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत संताप व्यक्त केली आहे. छत्रपतींनी जी मंदिरे वाचवली त्या छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करु नका अशा शब्दात संयोगिताराजे छत्रपती यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. रामनवमीच्या दिवशी संयोगिताराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.

Breaking News
Sanyogeetaraje Chhatrapati: वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांचा विरोध; छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे संतापल्या

दिल्ली : कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी

दिल्लीतील वजीरपूर भागातील एका कारखान्यात आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे क्षेत्र दिल्लीतील A-91, वजीरपूर औद्योगिक क्षेत्र जे. डी. धर्म फाट्याजवळ आहे.

इंदापूर पोलिसांनी 18 लाखांचा गुटखा पकडला

इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकलूज-इंदापूर महामार्गावर बंदी असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी कारवाई करत 18.08 लाख रुपयांचा गुटखा 24.08 लाख रुपयांचा माल जप्त केला.

वीज दरवाढीला न्यायालयात आव्हान, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली. त्यामुळं नवे वीजदर लवकरच लागू करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्याबाबत लवकरच आदेश जारी केला जाणार आहे. मात्र, आता याच प्रस्तावित वीज दरवाढीला महावितरणच्या माजी अभियंत्यानेच औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आहे. महावितरणचे माजी अभियंता अजित देशपांडे यांनी अॅड. गिरीश नाईक- थिगळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर 10 एप्रिल रोजी प्राथमिक सुनावणी होणार आहे.  

आठ तासांत 600 दुकानं जळून खाक, 7 जिल्ह्यांतील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

बनसमंडी, अन्वरगंज येथील कपड्यांच्या रेडिमेड मार्केटमध्ये पहाटे 2 वाजता आग लागली आणि हमराज कॉम्प्लेक्स, एआर टॉवरमधील रेडिमेड मार्केटसह 600 हून अधिक दुकानं जळून खाक झाली. आठ तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. आयुक्तालय पोलिसांनी आग विझवण्यासाठी लखनौ, उन्नाव, कानपूर देहाट आणि लष्कराच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराच्या जवानांसह पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

मुंबईत रामनवमीला दोन गटात राडा, 20 जण पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री समाजकंटकांनी दगडफेकसह पोलिसांवर पेट्रोलने भरलेल्या बॉटल्स फेकल्याची घटना घडली. त्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत रामनवमीला दोन गटात राडा झाला. या प्रकरणी २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Breaking News
छ. संभाजीनगरनंतर मुंबईत रामनवमीला दोन गटात राडा, २० जण पोलिसांच्या ताब्यात

राज्यात कोरोनाची रूग्णांची संख्या 3 हजार पेक्षा जास्त

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्यानेवाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनाच्या सक्रीय रूग्णांची संख्या ३०१६ येवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये १८४ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर रूग्ण बरं होण्याचा दर ९८.१४ टक्के येवढा आहे. रोज कोरोनांच्या रूग्णांमध्ये मोठी भर पडत असल्याने राज्यासाठी धोक्याची घंटा आहे.

पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही भागात उन्हाचा कडाका आहे. तर काही ठिकाणी पुन्हा अवकळी पावसानं हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्याच्या उत्तर भागात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावलीये. तलासरीतील अच्छाड परिसरात चांगला पाऊस झाला. सध्या संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

17 राज्यांत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

एप्रिल महिना सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक उरलाय. यंदा उन्हाळाही उशिरा सुरु होणार असल्याचं चित्र आहे. पुढील काही दिवस संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पावसाची (Heavy Rain in North India) शक्यता हवामान खात्यानं (Meteorology Department) वर्तवलीये. सध्या भारतात अफगाणिस्तान आणि इराणमधून उष्णतेची लाट येण्यास उशीर झाला आहे. आयएमडीनं राजस्थान आणि जम्मू-काश्मीरसह 17 राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यात दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यांचाही समावेश आहे. हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पूर्व राजस्थानमध्ये दोन दिवस हवामानात बदल जाणवणार आहे.

फडणवीस सरकारला हायकोर्टाचा झटका; आमदार निधी वाटपाला स्थगिती

शिंदे फडणवीस सरकारविरोधात दाखल केलेल्या याचीकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार षंढ आहे, ते काहीच करत नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारच्या नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कोणत्या आमदाराला किती निधी दिला? आणि तो कोणाच्या खात्यात जमा केला?, याचे तपशील सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहे.

टिळक विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. गीताली टिळक यांची निवड

टिळक विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. गीताली टिळक यांची निवड झाली आहे. पुढील पाच वर्षासाठी कुलगुरू म्हणून त्यांची निवड झालीये. याआधी जयंतराव टिळक यांनीसुद्धा कुलगुरू म्हणून काम पाहिलं होतं.

इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू

इंदूरच्या मंदिर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, NDRF आणि SDRF ची पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात असणाऱ्या मंदिरात काल (30 मार्च) रामनवमीच्या उत्सवादरम्यान भाविकाची मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंदिर परिसरात असलेल्या विहिरीवरील छतचा काही भाग कोसळल्यानं ही दुर्घटना घडली होती. 

Latest Marathi News : काल देशभरात रामनवमीचा उत्साह सुरू असतानाच महाराष्ट्रातील छ. संभाजीनगरमध्ये आणि गुजरात, तसंच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार पहायला मिळाला. सध्या तिन्ही राज्यात तणावपूर्ण शांतता आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे परदेश दौऱ्यावर आहेत. देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढत आहे. तसंच कर्नाटकात निवडणुका जाहीर होताच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com