
नवी दिल्ली : विदर्भातील ८६ हजार ४०९ हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र वन संवर्धन कायद्यातून वगळले जावे, अशा विनंतीची याचिका महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. झुडपी जंगल क्षेत्रातील अतिक्रमण कोणत्याही दंडाशिवाय नियमित केले जावे, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.