
Local Body Elections: महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने आज (६ मे २०२५) एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना जारी करावी आणि चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी.