Supreme Court: आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही; ‘स्थानिक’बाबत न्यायालयाचे निर्देश
Local Body Elections: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील आरक्षण मर्यादा, ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालय या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे. न्यायालयाने ५० टक्क्यांची मर्यादा न ओलांडण्याचे निर्देश देत २०२२ पूर्वस्थितीनुसार निवडणुका घेण्यास सांगितले.
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले.