Fire Brigade : अग्निशमन सेवांसाठी राज्याला ६१४ कोटी
Fire Safety : केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्यांतील अग्निशमन सेवांसाठी १६०० कोटींची मदत मंजूर केली आहे. यात महाराष्ट्राला ६१४ कोटी रुपये मिळणार आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह पाच राज्यांमधील अग्निशमन सेवांच्या विस्तारासाठी केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीने १६०० कोटी रुपयांच्या मदतीला आज मंजुरी दिली. यात महाराष्ट्राला ६१४ कोटी रुपये मिळणार आहेत.