Mahashivratri: केदारनाथ धामला मिळणार नवे 'मुख्य पुजारी'! महाशिवरात्रीला होणार अधिकृत घोषणा, काय आहे नांदेड कनेक्शन?
Kedarnath Raval: केदारनाथ धामचे ३२५ वे रावल महाशिवरात्रीला घोषित केले जाणार आहेत. नांदेड येथील कंधार तालुक्यातील शिरढोण मठातील केदार लिंग या ४२ वर्षीय शिवाचार्य यांना मुख्य पुजारीपदासाठी निवडण्यात आले.
हिंदू धर्मातील पवित्र द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ धामच्या रावल (मुख्य पुजारी) परंपरेत एक मोठा बदल होणार आहे. येत्या महाशिवरात्रीला, म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी, केदारनाथ धामला त्यांचे ३२५ वे रावल मिळणार आहेत.