महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी हत्यारं पुरवलं; तुषार गांधींचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tushar Gandhi, VD Savrkar and Mahatma Gandhi

महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी हत्यार पुरवलं; तुषार गांधींचा दावा

मुंबई - काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू आहे. आता या प्रकरणात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची एन्ट्री झाली आहे. सावरकरांनी गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला मदत केल्याचा दावाा त्यांनी केला आहे. (Tushar Gandhi news in Marathi)

हेही वाचा: Video : 'में सीनसिअर मिनिस्टर हु', असं म्हणत केसरकरांनी IAS अधिकाऱ्याला झापलं

तुषार गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं की, "सावरकरांनी केवळ इंग्रजांना मदत केली नाही तर बापूंना मारण्यासाठी नथुराम गोडसेला चांगली बंदूक मिळवून देण्यासही मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसेकडे कोणतेही शस्त्र नव्हते असही गांधी म्हणाले.

तुषार गांधी यांनी आणखी एका ट्वीटमध्ये लिहिलं की, "1930 च्या दशकात बापूंना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले होते. प्रबोधनकार ठाकरे (बाळासाहेब ठाकरे यांचे वडील) यांनी बापूंच्या साथीदारांना अकोला आणि विदर्भातील खुनाच्या कटाबाबत इशारा दिला होता. "सावरकर आणि हेडगेवार हे एका हिंदू संघटनेचे नेते होते, त्यामुळे प्रबोधनकारांनी त्यांना उद्देशूनच इशारा दिला होता. हा इतिहास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आठवण करून द्यायला हवा, असंही तुषार गांधी यांनी म्हटलं.

हेही वाचा: Electric vehicle : ईव्ही धोरणाला मंत्र्यांचा विरोध? 'मविआ'ने घेतलेल्या निर्णयाला कात्री लागण्याची शक्यता

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही सहभाग घेतला होता. तुषार गांधी शुक्रवारी (18 नोव्हेंबर) महाराष्ट्रातील बुलढाणा येथे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पोहोचले होते.