'दुसरा गाल पुढे करण्यासाठी...' कंगनाला गांधीजींचे पणतू तुषार गांधींचे उत्तर | Tushar Gandhi Reply on Kangana's Bheek statement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'दुसरा गाल पुढे करण्यासाठी...' कंगनाला गांधीजींचे पणतू तुषार गांधींचे उत्तर

दयेची याचना करण्यासाठी मागेपुढे न पाहणारे घाबरट होते असं म्हणत तुषार गांधी यांनी कंगनाच्या वक्तव्याला एका लेखातून उत्तर दिलं आहे.

'दुसरा गाल पुढे करण्यासाठी...' कंगनाला गांधीजींचे पणतू तुषार गांधींचे उत्तर

महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मंत्रावरून टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतला गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी उत्तर दिलं आहे. दुसरा गाल पुढे केल्यानं तुम्हाला भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. या वक्तव्यावर उत्तर देताना तुषार गांधी यांनी म्हटलं की, गांधींचा तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा दुसरा गाल पुढे करण्यासाठी जास्त धाडसं लागतं.

१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र एक भीक होती असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं होतं. त्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून महात्मा गांधींवर टीका केली होती. त्यात तिने म्हटलं होतं की, दुसरा गाल पुढे केल्यानं जे मिळते ती भीक असते, स्वातंत्र्य नव्हे. यांनी आपल्याला काय शिकवलं, जर एखाद्याने कानशिलात लगावली तर दुसरा गाल पुढे करा. अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. खरंतर असं स्वातंत्र्य मिळत नाही, त्यामुळे फक्त भीक मिळू शकते, आपल्या नेत्यांना हुशारीने निवडा असंही तिने म्हटलं होतं.

तुषार गांधी यांनी कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेणारा लेख लिहिला आहे. गांधींचा तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा दुसरा गाल पुढे करण्यासाठी जास्त धाडस लागतं असं शिर्षक त्यांनी दिलं आहे. जे लोक आरोप करतात की गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात कारण ते घाबरतात. खरंतर हे धाडस करण्यासाठी आवश्यक असलेल्या हिंमतीला ते समजू शकत नाहीत. ते अशा प्रकारचे शौर्य समजून घेण्यास समर्थ नाहीत.

हेही वाचा: 'स्किन टू स्किन' स्पर्शाशिवायही POCSO कायदा लागू होणार - SC

दुसरा गाल पुढे करणं हे घाबरण्याचं लक्षण नाही. यासाठी खूप धाडस लागत. त्यावेळी भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर ते दाखवलं होतं ते सर्वजण नेते होते. घाबरट ते होते ज्यांनी स्वार्थासाठी दया आणि क्षमा याचना करताना एकदाही मागेपुढे पाहिलं नाही असे म्हणत तुषार गांधी यांनी निशाणा साधला आहे.

गांधीजींना भिकारी म्हटल्याबद्दल स्वागत करू. देशासाठी आणि देशातील लोकांसाठी त्यांनी भीक मागण्यात त्यांनी संकोच बाळगला नाही. असत्य कितीही मोठ्याने ओरडलं आणि सत्याचा आवाज कितीही लहान झाला तरी सत्य कायम राहतं असंही तुषार गांधी यांनी म्हटलं. 1947 ला भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती या कंगनाच्या वक्तव्यावरही तुषार गांधी यांनी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, हा हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अपमान आहे.

loading image
go to top