रिकव्हरी एजंटनं शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला चिरडलं! महिंद्रांविरोधात व्यक्त होतोय रोष

सोशल मीडियावर लोकांच्या रोषाचा आनंद महिंद्रांना करावा लागतोय सामना
Anand Mahindra
Anand Mahindra

नवी दिल्ली : कर्जाच्या रिकव्हरीसाठी महिंद्राच्या रिकव्हरी एजंटनं शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडून तिचा आणि तिच्या बाळाचा जीव घेण्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला आहे. दरम्यान, या घटनेबाबत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं तीन दिवसांपूर्वी शोक व्यक्त केला होता. तसेच आनंद महिंद्रा यांनी देखील या घटनेचं वर्णन भयानक घटना असं केलं होतं. पण याबाबत कोणत्याही प्रकारे दिलगिरी व्यक्त केली नव्हती. त्यामुळं त्यांना या घटनेवरुन सोशल मीडियावर लोकांच्या रोषाचा सामान करावा लागत आहे. (Mahindra Finance recovery agent crushes farmer pregnant daughter to death at Chattisgarh Hazaribagh)

काय घडली होती घटना?

Mahindra Finance च्या Loan recovery agent नी छत्तीसगडच्या हजारीबागमधील मिथिलेश मेहता या शेतकऱ्याच्या गरोदर मुलीच्या अंगावरून दोन वेळा वाहन चालवला. या अघोरी घटनेत या मुलीचा आणि तिच्या बाळाचा जीव गेला. दहा हजार रुपयांच्या थकबाकीसाठी ट्रॅक्टर ओढून नेताना ते थांबवण्यासाठी आलेल्या मेहता यांच्या मुलीवर या रिकव्हरी एजंटनं वाहन चालवलं होतं.

आनंद महिंद्रांनी केलं ट्विट

दरम्यान, या घटनेवर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत हा भयानक प्रकार असल्याचं सांगतं आपण संबंधीत शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्यासोबत आहोत, असं म्हटलं होतं. महिंद्रा ग्रुपचे एमडी आणि सीईओ डॉ. अनिश शाह यांनी ट्विटवर शेअर केलेल्या कंपनीचं निवदेन महिंद्रांनी शेअर करण्यात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

महिंद्रा कंपनीनं अधिकृत निवेदनात काय म्हटलं?

हजारीबाग घटनेबाबत महिंद्रा ग्रुपचे एमडी आणि सीईओ डॉ. अनिश शाह यांनी कंपनीचं अधिकृत निवदेन शेअर केलं होतं. या निवेदनात म्हटलं की, "हजारीबागमध्ये घटलेल्या मानवी हत्येबाबत आम्हाला आतिव दुःख झालं असून अस्वस्थ झालो आहोत. आम्ही सर्व बाजूंनी या घटनेची चौकशी करु तसेच थर्ड पार्टीद्वारे कंपनीचं लोन कशा पद्धतीनं रिकव्हर केलं जातं आहे, याबाबत तपास करु. या घटनेच्या तपासात काम करणाऱ्या सर्व तपास एजन्सीना आम्ही शक्य ती सर्व मदत करु. या दुःखद प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबाच्या सोबत उभे आहोत"

सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केला रोष

दरम्यान, हैदराबादमधील पेशानं डॉक्टर असलेल्या विनय काटे यांनी फेसबूक पोस्ट लिहिली. यात त्यांनी थेट आनंद महिंद्रा यांच्यावर आगपाखड केली आहे. त्यांनी म्हटलं की, ट्विटरवर जगाला मोटिवेशन आणि देशभक्तीचे डोस पाजत बसण्यापेक्षा आधी स्वतःच्या कंपनीत लोकांना माणसासारखं वागायला शिकवा! एवढी मोठी घटना घडली तरी तुम्ही आणि तुमच्या कंपनीनं फक्त दुःख व्यक्त केलं, पण माफी मागायची तुमची इच्छा नव्हती. तुम्ही आणि तुमची कंपनी मुजोर आणि अमानवी आहात. तुम्हाला खरंच मनाची तरी लाज आहे का? असा सवालही विनय काटे यांनी विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com