Mainpuri Temple Shooting : उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात शनिवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. कोतवाली परिसरातील (Uttar Pradesh Crime) मोहल्ला किल्ला बाजारिया येथील शिवमंदिरात पूजा करत असलेल्या 21 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने सलग तीन गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमी तरुणीची प्रकृती गंभीर आहे.