esakal | गुजरात मंत्रिमंडळात होणार मोठे बदल, 21 दिग्गज नेत्यांना मिळणार डच्चू?
sakal

बोलून बातमी शोधा

bhupendra patel

गुजरात मंत्रिमंडळात होणार मोठे बदल, 21 दिग्गज नेत्यांना मिळणार डच्चू?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदाबाद : भूपेंद्र पटेल यांनी दोन दिवसांपूर्वीच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची (Gujrat CM Bhupendra patel) शपथ घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित हा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र, आता पटेलांच्या मंत्रिमंडळात (Gujrat cabinet) मोठे बदल होण्याची शक्यता असून जुने आणि दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. नव्या २१ ते २२ मंत्र्यांना शपथ दिली जाणार असून स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री;पाहा व्हिडिओ

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी बाकी आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा रंगली होती आणि अचानकच भूपेंद्र पटेल यांचे नाव समोर आले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुजरात विधानसभेत एकूण १८२ पैकी ११२ आमदार भाजपचे आहे. आता पटेलांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. जुने आणि दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार असून मंत्रिमंडळात महिलांना अधिक प्रतिनिधीत्व मिळणार आहे. जातीचे समीकरण साधण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच पाटीदार, कोळी आणि आदिवासी असे सामाजिक समीकरण साधणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

कोण आहेत भूपेंद्र पटेल?

पटेल हे २०१७ मध्ये घाटलोडिया मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात पदविका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ते जवळचे समर्थक मानले जातात. तब्बल एक लाख 17 हजार मतांच्या फरकाने ते आमदार म्हणून विजयी झाले होते. काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा त्यांनी पराभव केला होता.

loading image
go to top