ASI Conservation: ११०० वर्षे जुन्या माला देवी मंदिराचे होणार पुनर्निर्माण; एएसआयकडून वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन

Mala Devi Temple Restoration : मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील ११०० वर्षे जुन्या माला देवी मंदिराचे एएसआयकडून वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करण्यात येणार आहे. मंदिरातील प्रत्येक दगडाचे क्रमांकन व डिजिटल दस्तऐवजीकरण करून मूळ स्वरूपात पुनर्बांधणी केली जाणार आहे.
ASI plans scientific restoration of the 1,100-year-old Mala Devi Temple in Vidisha, Madhya Pradesh

ASI plans scientific restoration of the 1,100-year-old Mala Devi Temple in Vidisha, Madhya Pradesh

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील ग्यारसपूर येथे टेकडीवर वसलेल्या सुमारे ११०० वर्षे जुन्या माला देवी मंदिराला कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) वैज्ञानिक पद्धतीने मंदिराचे विघटन करून त्याची मूळ स्वरूपात पुनर्बांधणी करण्याची योजना आखली आहे. यासाठी मंदिरातील प्रत्येक कोरीव दगड, स्तंभ आणि शिल्पाचे क्रमांकन व डिजिटल दस्तऐवजीकरण केले जात आहे.

Loading content, please wait...