Mallikarjun Kharge : कुंभमेळ्यामुळे गरिबी हटणार नाही; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची भाजप नेत्यांवर टीका
MahaKumbh Mela 2025: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप नेत्यांच्या कुंभमेळ्यातील स्नानावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, गंगेमध्ये स्नान केल्याने देशातील गरिबी दूर होणार नाही.
महू (मध्यप्रदेश) : भाजप नेत्यांच्या कुंभमेळ्यातील स्नानावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज टीकास्त्र सोडताना, ‘‘गंगेमध्ये स्नान केल्याने देशातील गरिबी दूर होणार नाही’’ असा टोला लगावला.