Mallikarjun Kharge : अकरा वर्षांत कोट्यवधींचा गैरव्यवहार; मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोदी सरकारवर आरोप
Political Controversy : मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ६.३६ लाख कोटींचे बँक गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. सरकारच्या नसांमध्ये भ्रष्टाचार असल्याची टीका त्यांनी केली.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात देशभरात तब्बल ६.३६ लाख कोटी रुपयांचे बॅक गैरव्यवहार झाल्याचा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज केला. सरकारच्या नसानसांमध्ये भ्रष्टाचार भिनला असल्याचा टोलाही खर्गे यांनी लगावला.