PM face for INDIA bloc : 'हो! मीच मांडला खरगेंचा प्रस्ताव'; पंतप्रधानपदाचा उमेदवार का? ममतादिदी स्पष्टच बोलल्या

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला
PM face for INDIA bloc
PM face for INDIA bloc

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला . यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान दिल्लीत बुधवारी बॅनर्जी यांनी सेंट्रल फंड्सच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींची भेट घेतली, यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी खरगे यांचं नाव का पुढे केलं याबद्दल खुलासा केला आहे.

इंडिया आघाडीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे केले. ममता बॅनर्जी यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, इंडिया आघाडीत पीएम पदाचा उमेदवार कोण आहे याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत, म्हणून मी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे केल्याचं म्हणाल्या. तसेच ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या प्रस्तावाला अरविंद केजरीवाल यांनी देखील समर्थन दिल्याचा दावा केला आहे.

PM face for INDIA bloc
Jagdeep Dhankhar : मी सुद्धा २० वर्षांपासून असाच अपमान सहन करतोय... नकलेवरून मोदींनी केला उपराष्ट्रपतींना फोन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दलित नेता पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्याची मागणी केल्याचे यावेळी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, दरवेळी लोक मागणी करत आहेत की, एक फेस पाहिजे. तुमचा चेहरा कोण आहे... म्हणून मी प्रस्ताव ठेवला होता की खरगे यांचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून दिलं पाहिजे. ते जर पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही. तसेच आम्हाला अरविंद केजरिवाल यांनी पाठिंबा दिला आहे.

नितीश कुमार तुमच्या या मागणीमुळे नाराज आहेत का? या प्रश्नावर मला त्याबद्दल काही माहिती नाही असं उत्तर दिलं.

PM face for INDIA bloc
Survey On NaMo App : भाजप खासदारांचं टेन्शन वाढलं! तिकीट देण्यापूर्वी ‘नमो’अ‍ॅप तपासणार लोकांचा मूड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com