ममता आणि तृणमूल नेत्यांच्या प्रोफाईलवर एकच फोटो

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मे 2019

पं. विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याबद्दल गुरुवारी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी तृणमुलच्या प्रोफाईलसह स्वतःच्या आणि तृणमुल नेत्यांच्या अकाउंटचे प्रोफाईल फोटो बदलून विद्यासागर यांचे छायाचित्र लावले. फेसबुक अकाउंटचेही प्रोफाईल फोटो बदलण्यात आले आहेत. 

कोलकता : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या राड्यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून बंगाली लेखक पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याने तृणमुल काँग्रेस, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे प्रोफाईल फोटो म्हणून विद्यासागर यांचा फोटो ठेवला आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: 'राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल काँग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा यांना 'रोड शो' अर्धवट सोडून पोलिस संरक्षणात तेथून बाहेर पडावे लागले. ममता बॅनर्जी यांनी या सर्व प्रकारानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची संभावना गुंड अशी केली. "पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड करणाऱ्यांना गुंड याशिवाय दुसरे काय म्हणणार?,'' अशी टीका ममता यांनी बेहाला येथील रॅलीमध्ये बोलताना केली. 

पं. विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याबद्दल गुरुवारी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी तृणमुलच्या प्रोफाईलसह स्वतःच्या आणि तृणमुल नेत्यांच्या अकाउंटचे प्रोफाईल फोटो बदलून विद्यासागर यांचे छायाचित्र लावले. फेसबुक अकाउंटचेही प्रोफाईल फोटो बदलण्यात आले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee Derek O'Brien change Twitter profile picture to Vidyasagars image