

Knife Attack Attempt
esakal
| Kolkata Civic Volunteer Detained: कोलकात्यातील कालीघाट भागात मंगळवारी संध्याकाळी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळ एका महिलेने हातात चाकू घेऊन त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.