BSF च्या कार्यक्षेत्राबाबतचा निर्णय मागे घ्या; PM मोदींच्या भेटीत ममतांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee Meet Modi

BSF च्या कार्यक्षेत्राबाबतचा निर्णय मागे घ्या; PM मोदींच्या भेटीत ममतांची मागणी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल क्राँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर झाल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. भेटीदरम्यान सीमा सुरक्षा दलाचे (BSF) अधिकार क्षेत्र वाढविण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय पश्चिम बंगालशी संबधित विविध विषयांवरील चर्चा झाल्याचेही ममता यांनी सांगितले.

केंद्राने नुकतीच सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र सीमेपासून 15 किमीवरून 50 किमीपर्यंत वाढविले ​​आहे. यानंतर पंजाब आणि बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सीमी सुरक्षा दलाच्या कार्यकक्षेच्या विस्ताराच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे तसेच हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.

loading image
go to top