esakal | Mamata Banerjee stages dharna in Kolkata to protest ECs 24hour ban on her campaigning in West Bengal assembly polls

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee stages dharna in Kolkata

ममता बॅनर्जींचं गांधी मूर्तीसमोर धरणे आंदोलन; बसल्या बसल्या चित्रेही काढली

sakal_logo
By
विनायक होगाडे

कोलकाता : निवडणुकीच्या आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत आता त्यांच्यावर 24 तासांची बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यानच्या काळात, त्या प्रचार करु शकणार नाहीयेत. निवडणूक आयोगाकडून 24 तासांसाठी प्रचारावर बंदी घालण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता धरणे देण्यासाठी बसल्या आहेत. यावेळी त्या बसल्या बसल्या काही चित्रे काढतानाही दिसून आल्या. कोलकातामध्ये गांधी मुर्तीच्या जवळ ममता बॅनर्जी धरणे देत आहेत. निवडणूक आयोगाने ही कारवाई ममता बॅनर्जी यांच्या हिंदू-मुस्लिम संदर्भातील वक्तव्यावर केली आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम मतांवरुन वक्तव्य केलं होतं. आठ एप्रिल रोजी हुगलीमध्ये ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभेदरम्यान मुस्लिम मतांमध्ये विभाजन न होण्याबाबत वक्तव्य केलं होतं.

हेही वाचा: Mumbai Corona vaccination: लसीकरणासाठी पालिका थेट घरापर्यंत जाणार

यावरच निवडणूक आयोगाने त्यांच्यावर प्रचारास बंदी घातली आहे. ममता बॅनर्जी यांनी 12 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून ते 13 एप्रिल रात्री 8 वाजेपर्यंत कोणत्याही निवडणूक प्रचारात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईवर आता ममता बॅनर्जी या धरणे देण्यास बसल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचारावर बंदी घातल्यानंतर डेरेक ओ ब्रायन यांनी हा लोकशाहीसाठी काळा दिन असं म्हटलं आहे. डेरेक ओ ब्रायन यांनी म्हटलंय की, भाजपला माहितीय की, आम्ही निवडणूक जिंकत आहोत. यासाठीच ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई होत आहे.

का घातली प्रचारावर बंदी?
मुस्लिम मतदारांना मतांचे विभाजन होऊ न देण्याचे आवाहन आणि महिलांना सुरक्षा दलांना घेराव करण्याचा दिलेला सल्ला यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना नोटिस जारी केली होती. ममतांच्या उत्तराने समाधानी नसलेल्या निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरील बंदीचा आदेश तत्काळ लागू झाला आहे. सोमवारी रात्री 8 ते मंगळवारी 8 पर्यंत त्या प्रचार करु शकणार नाहीत. निवडणूक आयोगाने त्यांना भविष्यात अशाप्रकारचे वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला आहे. निवडणूक आयोगाने ममतांच्या वक्तव्याची निंदा केली असून अशा वक्तव्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते, असं म्हटलं आहे.