'मोदी आणि शहांची विधाने परस्परविरोधी'

Amit-and-narendra
Amit-and-narendra

कोलकता - नागरिकत्व कायद्याविरोधात दंड थोपटणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पत्रिकेबाबत (एनआरसी) पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही परस्परविरोधी विधाने करत असून, यामध्ये खरे कोण बोलतोय, हाच खरा प्रश्‍न असल्याची टीका त्यांनी केली.

ममतांच्या नेतृत्वाखाली आज नागरिकत्व कायद्याविरोधात येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यापासून ते गांधी भवनपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी झालेल्या सभेत बोलताना ममता म्हणाल्या, "उद्धट भाजपला झारखंडमधील जनतेने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, तेथील विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला.'' मोदींच्या विधानाचा संदर्भ देताना ममता म्हणाल्या, "राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेचा (एनआरसी) देशभरात अंमलबजावणीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे सांगत यावर चर्चादेखील झाली नसल्याचे ते सांगत आहेत; पण काही दिवसांपूर्वीच भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशभर "एनआरसी'ची अंमलबजावणी होईल, असे म्हटले आहे. या दोन्ही नेत्यांची ही विधाने परस्परविरोधी आहेत. आता या दोघांमध्ये कोण खरे बोलतो आहे, हेच आम्हाला समजत नाही. भाजप धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करत असून हे आम्ही देणार नाही.'

या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड

राज्यपालांविरोधात आंदोलन
कोलकता : जादवपूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी आलेले पश्‍चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांना आज पुन्हा आंदोलकांच्या रोषास सामोरे जावे लागले. आंदोलकांनी त्यांच्या वाहनांचा ताफाच रोखून धरल्याने त्यांना आल्यापावली माघारी परतावे लागले. धनकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला. तृणमूल कॉंग्रेसशीच संबंधित शिक्षा बंधू समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा ताफा रोखून धरल्याचे बोलले जाते. धनकर यांनी या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू सुरंजनदास यांच्यावरही टीका केली असून, त्यांनी जाणीवपूर्वक या प्रकाराबाबत मौन बाळगल्याचा आरोप केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com