esakal | ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Benerjee

ममताच होणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री; शपथविधीचा ठरला मुहूर्त

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) तृणमूल काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ (oath) घेणार आहेत. तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडणार आहे. (Mamata Banerjee to take oath as Chief Minister on 5th May)

ममता बॅनर्जी आज (सोमवार) रात्री ७ वाजता राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर बुधवार, ५ मे रोजी त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हेही वाचा: तीन दिवसांत राज्यांना मिळणार ५८ लाखांहून अधिक लसींचे डोस - केंद्र सरकार

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत हॅटट्रिक केली आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे. २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने २१३ जागांवर दणदणीत विजय मिळवळा आहे. तृणमूलची २०२१ च्या निवडणुकीतील कामगिरी २०१६ च्या कामगिरीपेक्षा सरस ठरली आहे. २०१६ मध्ये तृणमूलला २११ जागा मिळाल्या होत्या. तसेच या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावणाऱ्या भाजपला ७७ जागा मिळाल्या आहेत.

loading image