esakal | ममतांचा विजय हा भाजपच्या 'दीदी ओ दीदी'ला सडेतोड उत्तर - अखिलेश यादव

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav

ममतांचा विजय हा भाजपच्या 'दीदी ओ दीदी'ला सडेतोड उत्तर - अखिलेश यादव

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसचं सरकार बनणं आता जवळपास निश्चित झालं आहे. सध्या सुरु असलेल्या मतमोजणीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष २०२ जागांवर आघाडीवर आहे. यावर आनंद व्यक्त करताना समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ममतांचं अभिनंदन केलं आहे.

अखिलेश यादव यांनी ट्वीट केलं की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करणारी जागरुक जनता आहे. झुंजारु नेत्या ममता बॅनर्जी आणि तृणमूलच्या समर्पित नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. भाजपावाल्यांनी एका महिलेवर केलेल्या 'दीदी ओ दीदी' अशा आक्षेपार्ह टिपण्णीवर जनतेद्वारे दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे."

आजचा दिवस हा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीचा दिवस आहे. सकाळपासून या राज्यांत मतमोजणी सुरु आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आसाम या पाच राज्यांमध्ये नुकत्याच निवडणूका पार पडल्या होत्या. त्यांची आज मतमोजणी सुरु आहे.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रचार केला होता. भाजपाचे प्रमुख नेते व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये २०० जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. पण भाजपाला १०० जागाही मिळू शकल्या नाहीत. २९४ जागांच्या पश्चिम बंगालच्या विधानसभेत बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता आहे. मात्र, तृणमूल काँग्रेस त्याही पेक्षा खूपच अधिक २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.