.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोलकता : ‘‘ येत्या रविवारपर्यंत (ता.१८) राज्य पोलिसांना महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी दोषींना पकडण्यात यश आले नाही तर आम्ही हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवू,’’ असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज केले.