नेताजींच्या जयंती दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; ममता दीदींचे PM मोदींना पत्र

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 18 November 2020

23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. नेताजी देशाचे हिरो आहेत. राष्ट्रीय नेता आणि ब्रिटीश सरकारविरोधातील स्वांतत्र्य  लढ्यातील ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल आर्मीच्या हजारो जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे, असा उल्लेखही ममता बॅनर्जी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये केलाय.  

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी (West Bengal's CM Mamata Banerjee)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (PM Narendra Modi) पत्र लिहिले आहे. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची जयंती असून हा दिवशी देशभरात सार्वजनिक सुट्टी  (National Holiday) जाहीर करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास वेगाने करण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत. तसेच या प्रकरणातील सर्व गोष्टी सार्वजनिक कराव्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

कपिल सिब्बल यांच्यानंतर आता चिदंबरम यांचा काँग्रेसला उपदेशाचा डोस!

23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. नेताजी देशाचे हिरो आहेत. राष्ट्रीय नेता आणि ब्रिटीश सरकारविरोधातील स्वांतत्र्य  लढ्यातील ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल आर्मीच्या हजारो जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे, असा उल्लेखही ममता बॅनर्जी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये केलाय.  

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

त्यांनी पुढे लिहिलंय की, प्रत्येक वर्षी संपूर्ण देशात नेताजींची जयंती मोठ्या अभिमानाने आणि श्रद्धेनं साजरी केली जाते. बऱ्याच दिवसांपासून आम्ही नेताजींच्या जंयती दिवशी संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्याची मागणी करत आहोत. महान नेता आणि देशाचे हिरो असलेल्या नेताजींच्या सन्मानासाठी पुन्हा एकदा आम्ही 23 जानेवारी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी करत आहोत.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mamata banerjee writes to pm modi to declare birth anniversary of netaji subhas chandra bose national holiday