Crime News: पार्टनर बनला राक्षस! सेक्स करण्यास नकार दिल्याने महिलेवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला

Crime News
Crime News

Gurugram Crime News : हरियाणातील गुरुग्राम शहरात एका तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

सेक्स नाकारल्याने हे क्रूर कृत्य आरोपीने केल्याचे पीडितेने म्हटले आहे. शिवम कुमार असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला गुरुग्राममधील राजीव चौकातून अटक केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

शिवमने गुरुवारी जबरदस्तीने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिने नकार दिल्याने त्याने तिच्या मानेवर स्क्रू ड्रायव्हरने वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती तिच्या पतीपासून वेगळी झाली आणि गुरुग्राममध्ये भाड्याच्या खोलीत राहत होती, जिथे तिची उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील रहिवासी शिवम कुमारशी भेट झाली. त्यानंतर ते एकत्र राहू लागले. (Crime News)

Crime News
Gas Cylinder: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्यातील सरकार देणार मोफत गॅस सिलिंडर, खात्यात येणार 914 रुपये

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, "आमचे लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर काही दिवसात शिवमने लग्नाच्या बहाण्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. शिवमचे लग्न झाल्याचे मला नुकतेच कळले. गुरुवारी संध्याकाळी तो बाईकवर आला आणि पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मी नकार दिल्याने तो रागाने माझ्या मानेवर स्क्रू ड्रायव्हर मारून पळून गेला." (latest marathi news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला शेजाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली.

Crime News
Sharad Pawar: माणुसकी वगैरे जपणारच कारण तुमचेच राजकीय संस्कार, अजित पवार गटातील नेत्याचे शरद पवारांना उत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com