esakal | स्वत:च्या मुलीचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात गेला; शांतपणे म्हणाला, 'बॉडी घरी आहे'
sakal

बोलून बातमी शोधा

up news

उत्तर प्रदेशच्या (UP) हरदोई  (Hardoi)  जिल्ह्यात एक भयानक प्रकार पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यातील एका गावात बुधवारी सकाळी लोक घाबरले जेव्हा रस्त्यावर त्यांना एक व्यक्ती हातात कापलेले शिर घेऊन फिरताना दिसला

स्वत:च्या मुलीचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात गेला; शांतपणे म्हणाला, 'बॉडी घरी आहे'

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या (UP) हरदोई  (Hardoi)  जिल्ह्यात एक भयानक प्रकार पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यातील एका गावात बुधवारी सकाळी लोक घाबरले जेव्हा रस्त्यावर त्यांना एक व्यक्ती हातात कापलेले शिर घेऊन फिरताना दिसला. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीने आपल्या 17 वर्षाच्या मुलीचे शिर आपल्या हातात घेतले होते. लखनऊपासून 200 किलोमीटर दूर असणाऱ्या पांडेयतारा गावातील ही घटना आहे. या प्रकारमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. व्यक्तीचे नाव सर्वेश कुमार असल्याचं सांगण्यात आलंय. हा व्यक्ती आपल्या मुलीचे शिर हातात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला होता. हरदोई जिल्ह्याच्या मझिला पोलिस स्टेशन क्षेत्रात ही घटना घडली आहे. 

सर्वेश कुमारने स्वत:च्या मुलीचे शिर कापून तिला मारुन टाकले होते. सर्वेशने या भयानक कृतीमागचं कारण सांगितलं असून तो आपल्या मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे नाराज होता. याच रागातून त्याने आपल्या 17 वर्षाच्या मुलीचा निर्घुणपणे खून केला आहे. सर्वेश जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा पोलिसांनाही मोठा धक्का बसला. दोन अधिकाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि त्याचे नाव विचारले. तो कुठे राहतो, त्याचं नाव काय, तसेच त्याने कोणाचे शिर हातात घेतले आहे, असे प्रश्न पोलिसांनी त्याला विचारले. सर्वेश कुमारने या सर्व प्रश्नांचे उत्तरं कसलीही आडकाठी न घेता सांगून टाकले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आपल्या पश्चातापाचा लवलेशही नव्हता. 

बलात्कारास विरोध करणाऱ्या 12 वर्षीय मुलीचा खून; पीडितेला घरातच पुरले

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्याने आपल्या मुलीचे शिर धारदार शस्त्राने कापले होते, कारण एका व्यक्तीसोबत असणाऱ्या तिच्या प्रेम संबंधांमुळे तो नाराज होता. त्यामुळे संतापून त्याने हे कृत्य केले. सर्वेश व्हिडिओमध्ये शांतपणे सांगत आहे की, 'हे मी केलं आहे. दुसऱ्याने हे केलं नाही. मी घरी गेलो, दरवाजा बंद केला आणि तिचे शीर कापले. तिचा मृतदेह घरी आहे'. पोलिसांनी सर्वेशला सांगितलं की शिर खाली ठेव आणि जमिनीवर बस. त्याने पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 

loading image
go to top