१२ वर्ष तो जेवलाच नाही; चक्क खातोय दगड!! Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

man-eating stone of-food-for-12-years
१२ वर्ष तो जेवलाच नाही; चक्क खातोय दगड! Viral

१२ वर्ष तो जेवलाच नाही; चक्क खातोय दगड!

मनुष्याला जगण्यासाठी अन्न लागते. एकवेळ जेवायला मिळाले नाही तर वडापाव खाऊनही जगणारी लोकं आपल्याकडे आहेत. पण एका माणूस चक्त दगड खाऊन जगलाय. तोही चक्क १२ वर्ष. विश्वास बसन नसेल पण हे खऱं आहे. छत्तीसगडच्या जशपुर जिल्ह्यातील बगीचा विकासखण्ड ब्लॉकमधील छिपाताला येथे राहणारे संतोष लकडा असे त्यांचे नाव आहे. संतोष गेली १२ वर्ष दगड खातो आहे. तो दावा करतो की दगड खाऊन ईश्वरी प्रार्थनेने तो लोकांचे आजार, दुःख आणि वेदना दूर करतो. त्याच्याविषयीची माहिती सध्या व्हायरल होते आहे.

हेही वाचा: Viral : आईच्या हातचा पदार्थ बनतो 'दगड'! मुलाचा निबंध होतोय व्हायरल

१२ वर्ष खातोय दगड

संतोष सांगतो की तो गेली १२ वर्ष सतत दगड खातो आहे. अशाप्रकारे त्याची दगड खाण्याची पद्धत पाहून लोकंही हैराण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी आजपर्यंत कोणालाही असे दगड खाताना पाहिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नातेवाईकांना सुरूवातीला दगड खाल्ल्याने त्याला काहीतरी होईल अशी भिती वाटत होती. पण आता त्यांनाही सवय झाली आहे. संतोषची पत्नी अलिशाने सांगितले की, आतापर्यंत त्याने एका गोणीपेक्षा जास्त दगड खाल्लेले आहेत. दगड खाल्ल्याने संतोषला कोणताही त्रास झाला नाही किंवा आजपर्यंत त्याला डॉक्टरांकडे न्यावे लागलेले नाही.

हेही वाचा: माठातून पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे! आयुर्वेदानुसार महत्व वाचा!

दगड खाल्ल्याने काय होते?

संतोषचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास आहे. त्याने आपल्या घरात येशूचे अनेक पुतळे आणि फोटो लावले आहे. पूजेच्या खोलीत बसून प्रार्थनेद्वारे लोकांच्या समस्या दूर केल्याचा संतोषचा दावा आहे. त्यासाठी प्रार्थना करायला हवी म्हणून तो प्रार्थनेसाठी गुडघ्यावर बसतो. दोन्ही गुडघ्याखाली खडबडीत दगड ठेवून देवाची पूजा करतो. प्रार्थनेनंतर, संतोष लोकांचे दु:ख आणि वेदना आपल्या आत घेण्यासाठी तोंडात दगडाचे तुकडे टाकून गिळतो. ते तुकडे पोटात जातात. पण त्यामुळे त्याला त्रास होत नाही. यामागे ईश्वराचा हात असल्याचा दावा संतोष करतो. असे दगड खाल्ल्याने त्याला अन्नपदार्थ खाण्याची गरज लागत नाही. दगड खाऊनच त्याचे पोट भरते. तसेच हे दगड त्याला सहज पचतात.

हेही वाचा: Anxiety Relief Tips : फक्त एक ग्लास पाणी प्या! अस्वस्थता दूर ठेवा

टॅग्स :Chhattisgarhviral'food