esakal | पाहुणे आले, लग्नही झालं पण नवरदेवाच्या वडिलांना...
sakal

बोलून बातमी शोधा

पाहुणे आले, लग्नही झालं पण नवरदेवाच्या वडिलांना...

15 जणांना कोरोनाची लागण

- 6 लाखांपेक्षा जास्त दंड

पाहुणे आले, लग्नही झालं पण नवरदेवाच्या वडिलांना...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भीलवाडा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु आता यामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यानुसार विवाह सोहळा आणि इतर काही कार्यक्रमांना सशर्त परवानगी देण्यात आली. पण यामध्ये उपस्थितांच्या संख्येबाबत अट घालण्यात आली आहे. मात्र, या नियम आणि अटींचे पालन न करणाऱ्या एका नवरदेवाच्या वडिलांना ते चांगलेच महागात पडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने विवाह सोहळा ठरलेल्या अनेकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. पण आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने याचा फायदा घेत काही जण विवाह आटोपून घेत आहेत. परंतु, सरकारच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नवरदेवाच्या वडिलांना चांगलेच महागात पडले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजस्थानमधील एका घरात 13 जून रोजी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी 50 हून अधिक लोकांना आमंत्रित केले होते. पण हे आमंत्रण नियमाविरोधात होते. या विवाह सोहळ्यासाठी 50 पेक्षा जास्त लोक हजर होते. त्यामुळे या लग्नातच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे कोणतेही पालन केले नसल्याचे समोर आले आहे. ही घटना राजस्थानमधील भिलवाडा येथे घडली. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले.  

6 लाखांपेक्षा जास्त दंड

हा लग्न सोहळा नियमांचे उल्लंघन करून झाल्याचे समजल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर भिलवाडा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी नवरदेवाच्या वडिलांना  6,26,600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

15 जणांना कोरोनाची लागण

या विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त जणांनी हजेरी लावत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. या लग्न समारंभात हजेरी लावल्यानंतर येथील 15 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा