
हुंडा न दिल्याने सासरच्यांकडूनच सामूहिक बलात्कार, नवऱ्यानेच शूट केला व्हिडीओ
हुंडा दिला नाही म्हणून राजस्थानमधल्या एका व्यक्तीने आपल्याच नातेवाईकांकरवी आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकाराचा व्हिडीओही त्याने शूट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावरही अपलोड केला आहे. महिलेच्या घरच्यांना दीड लाख रुपये हुंडा देता आला नाही, म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे.
आता आपण हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून त्यातून पैसे मिळवणार असल्याचं या व्यक्तीने आपल्या पत्नीला सांगितलं. या प्रकरणी पत्नीने लैंगिक अत्याचाराप्रकरणी आपला पती आणि त्याचे दोन नातेवाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: Tinder वर झाली ओळख, भेटीला बोलावून मुंबईत केला बलात्कार
फिर्यादी महिलेने सांगितलं की, माझ्या सासरचे लोक हुंड्यासाठी माझा छळ करत होते. जेव्हा त्यांना हुंडा दिला नाही, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना माझ्यावर सामुहिक बलात्कार करण्यास भाग पाडलं, ही घटना शूट केली आणि हे व्हिडीओ युट्यूबवर टाकले. त्यानंतर एका आरोपीने मला पाच दिवसांपूर्वी कमान इथं आणलं आणि पुन्हा बलात्कार केला, पण मी तिथून पळून माझ्या घरी आले. या दोघांचंही लग्न २०१९ साली झालं होतं.
Web Title: Man Forced Relatives To Gang Raped His Wife Video Uploaded On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..