Amazon वरून मागविले पासपोर्ट कव्हर, पण मिळाला खराखुरा पासपोर्ट

Indian-Passport
Indian-Passporte sakal

नवी दिल्ली : कुठल्याही वेबसाईटवरून ऑनलाइन वस्तू मागविल्यानंतर फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण, केरळमधील एका व्यक्तीसोबत एक विचित्रच घटना घडली. त्यांनी अॅमेझॉनवरून (amazon) पासपोर्ट कव्हर मागवले होते. पण, त्या कव्हरसोबत खराखुरा पासपोर्ट देखील आला आहे.

Indian-Passport
महिलेची चालकाकडूनच हत्या, सहा वर्षीय चिमुकलीमुळे उघडकीस आली घटना

मिथून बाबू असे या व्यक्तीचे नाव असून ते केरळमधील वायनाड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी ३० ऑक्टोबरला अॅमेझॉनवरून पासपोर्ट कव्हर ऑर्डर केले होते. त्यानुसार त्यांना १ नोव्हेंबरला त्यांची ऑर्डर मिळाली. मात्र, त्यांनी पार्सल उघडताच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामध्ये पासपोर्ट कव्हरसोबत खराखुरा पासपोर्ट देखील होता. त्यांनी लगेच अॅमेझॉनच्या कस्टमर केअरला फोन केला. पण, उत्तर ऐकून त्यांना धक्का बसला. ''अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. यानंतर विक्रेत्यांना आम्ही त्याची काळजी घेण्याच्या सूचना देऊ,'' असे उत्तर त्यांना मिळाले. पण, ऑर्डरसोबत आलेल्या पासपोर्टचे काय करायचे हे सांगितले नाही.

पण पासपोर्ट नेमका कोणाचा? -

खऱ्या पासपोर्टमधील तपशीलानुसार, तो केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मूळचा मोहम्मद सलीहचा आहे. पासपोर्टमध्ये फोन नंबर नसल्याने सुरुवातीला मालकाशी संपर्क होऊ शकला नाही. पण मिथुनच्या प्रयत्नांमुळे मालक सापडला. त्यांनी मागवलेले पासपोर्ट कव्हर हे मोहम्मद यांनी आधी मागविला आणि त्यामध्ये पासपोर्ट घालून त्यांनी तपासले असावे. त्यांना पासपोर्ट कव्हर आवडले नाही. त्यामुळे त्यांनी परत केले. मात्र, त्यासोबत पासपोर्टही गेला. पण, परत आलेल्या वस्तूची विक्रेत्याने व्यवस्थित तपासणी केली नाही आणि ते दुसऱ्या ग्राहकाला विकले, असेही मिथून म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com