मंत्र्यानं व्यासपीठावरच कापून घेतले केस, कोरोनामुळे बेरोजगार झालेल्याला केली मदत

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 12 September 2020

रोहिदाससारखे लोक हे कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीमध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हातातील काम गेले असून त्याच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.

भोपाळ : कोरोनामुळे बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या एका तरुणाला सढळ हाताने मदत करत मंत्र्याने एका तरुणाला 60 हजार रुपयांची मदत केली. संबंधित तरुणाने स्वत:चे नवे सलून उघडण्यासाठी मंत्र्याकडे आर्थिक मदत मागितली होती. वनमंत्री विजय शाह यांनी तरुणाचे कौशल्य पाहण्यासाठी स्वत:चे केस कापून घेतल्यानंतर त्याला 60 हजार रुपयांची मदत केली. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील गुलाईमल गावातील हा प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

आयपीएल आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी येथे क्लिक करा...

गुलाईमल गावातील रहिवासी रोहीदास याला स्वत:चे सलून दुकान उघडायचे होते. आणि त्यासाठी त्याने मंत्र्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्र्यांनी त्याच्या कौशल्याची चाचणी घेतली. चक्क व्यासपीठावर बोलवून विजय शाह यांनी त्याच्या हाती असलेले कसब पाहिले.  रोहिदासने मंचावर जाऊन मंत्र्यांचे केस कापले आणि दाढी केली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रोहिदासने मास्कही वापरल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर विजय शाह यांनी रोहिदासला चक्क 60 हजार रुपयांची मदत केली. तसेच सत्कारही केला.  

हिटमॅनने मारलेला सिक्स आदळला चालत्या बसवर ; एकदा पहाच

पत्रकारांशी संवाद साधताना विजय शाह म्हणाले की, रोहिदाससारखे लोक हे कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीमध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हातातील काम गेले असून त्याच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. वैयक्तिक निधीतून त्याला मदतीचा हातभार लावला.  ज्या गरजू तरुण लोकांना स्वत:चा छोटा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांना सरकार बँकेतून कर्ज उपलब्ध करुन देईल. त्यांना घेतलेल्या कर्जाची फक्त मुद्दल रक्कम फेडायची असून कर्जाच्या व्याजाची रक्कम हे सरकारकडून फेडण्यात येईल. असेही ते म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Gives MP Minister Haircut on Stage Rewarded Rs 60 000 to Set up Barbers Shop