बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे... हा विचार सतत मनात घोळत होता. दिवसेंदिवस संशय वाढू लागला आणि रागाचा पारा चढला.

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे... हा विचार सतत मनात घोळत होता. दिवसेंदिवस संशय वाढू लागला आणि रागाचा पारा चढला. या रागातूनच एकाने संपूर्ण कुटुंब संपवल्याची घटना येथे घडली आहे.

गाझियबाद शहरातील शताब्दी नगरमध्ये गुरुवारी (ता. 4) ही धक्कादायक घटना घडली. प्रदीपने (वय 37) पत्नीसह तीन मुलांना विष पाजून मारले आहे. कुटुंबाला संपवल्यानंतर त्याने आत्महत्या करुन जीवन संपवले. या घटनेबाबत सकाळी 5.40 मिनिटांनी पोलिसांना माहिती समजली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी तिघांचे मृतदेह आढळून आले तर दोघे जण गंभीर जखमी होते. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात प्रदीपने सविस्तर माहिती लिहीली आहे.

गाझियाबादचे पोलिस अधिकारी सुधिर कुमार सिंग यांनी सागितले की, 'प्रदीपला दारुचे व्यसन होते. पत्नीवर तो सतत संशय घ्यायचा. पत्नीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचा त्याला संशय होता. या संशयामधून त्याने संपूर्ण कुटुंब संपवले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man kills wife over suspicion of having affair, poisons 3 kids, commits suicide at Ghaziabad