Delhi Crime : दिल्लीत लाजीरवाणी घटना! तरुणीसमोर बसमध्ये पुरुषाने असे काही केले की... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi crime news

Delhi Crime : दिल्लीत लाजीरवाणी घटना! तरुणीसमोर बसमध्ये पुरुषाने असे काही केले की...

नवी दिल्ली : दिल्लीतील बसमध्ये लाजीरवाणी घटना घडली आहे. दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (DTC) कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आरोप केला आहे की, दिल्लीतील रोहिणी भागात बसमध्ये एका व्यक्तीने मुलीसमोर हस्तमैथुन केले. या व्यक्तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारची आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर बसच्या मार्शलने त्या व्यक्तिला पकडले. त्यानंतर आरोपी रडायला लागला. (man masturbated in front of girl in delhi bus)

या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही. त्यामुळे अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. या घटनेबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळताच बिहारमध्ये राहणाऱ्या आरोपी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र तक्रार नसल्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. 

हेही वाचा: Execlusive: 'जर कारवाई झाली तर..'. चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर उर्फीची पहिली प्रतिक्रिया..

व्हायरल व्हिडिओ नुसार, आरोपीने मंगळवारी डीटीसी बसमध्ये हस्तमैथुन केले. त्यानंतर बसमध्ये तैनात मार्शल संदीप चकारा यांनी आरोपीला पकडले. त्यानंतर आरोपी रडत होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Urfi Javed Case: सुषमा अंधारेंना चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, चार भिंतीच्या आत...

बुधवारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर उत्तर रोहिणी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक सुमन यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भात पीडितेला तक्रार देण्यासाठी संपर्क करण्यात आला. मात्र पीडितीने या संदर्भात तक्रार करण्यास नकार दिला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: Marriages During Corona : अल्पावधीतच वाढली नवविवाहितांची घटस्फोटांची मागणी!

टॅग्स :crimedelhi