मोदींनंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत चूक; चाकू घेऊन अज्ञात व्यक्ती पोहोचली स्टेजवर अन्.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

कामगारांनी त्वरित 'त्या' व्यक्तीला पकडलं आणि त्याच्याकडून चाकू हिसकावून घेतलाय.

नरेंद्र मोदींनंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर (Narendra Modi) उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधम सिंह नगर (Udham Singh Nagar) येथील एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचं प्रकरण समोर आलंय. उधम सिंह नगरच्या काशीपूरमध्ये एक व्यक्ती चाकू घेऊन थेट रावत यांच्या स्टेजवर पोहोचली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व नेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली.

दरम्यान, कामगारांनी त्वरित त्या व्यक्तीला पकडलं आणि त्याच्याकडून चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. उधम सिंह नगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) दिलीप सिंह कुंवर (Dilip Singh Kunwar) यांनी सांगितलं की, काँग्रेस पक्षानं (Congress Party) आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान चाकू फिरवल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री हरीश रावतही उपस्थित होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top