CAA : हाजी नसते, तर मी वाचलो नसतो; जमावाच्या तावडीत सापडलेल्या पोलिसाचा अनुभव

वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

नागरिकत्व कायद्यावरून देशभर आंदोलने आणि गदारोळ सुरु असताना उत्तरप्रदेशातील फिरोजाबादमध्ये एक माणुसकी दाखवणारी घटना घडली आहे. संतप्त जमाव पोलिसाच्या अंगावर धावून जात असताना त्याच गर्दीतून पुढे आलेल्या एका मुस्लिम व्यक्तीने पोलिसाचा जीव वाचवला आहे.

फिरोजाबाद : नागरिकत्व कायद्यावरून देशभर आंदोलने आणि गदारोळ सुरु असताना उत्तरप्रदेशातील फिरोजाबादमध्ये एक माणुसकी दाखवणारी घटना घडली आहे. संतप्त जमाव पोलिसाच्या अंगावर धावून जात असताना त्याच गर्दीतून पुढे आलेल्या एका मुस्लिम व्यक्तीने पोलिसाचा जीव वाचवला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या आठवड्यातील ही घटना असून फिरोजाबादमध्येही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी आंदोलक आणि पोलिस एकमेकांसमोर आले होते. आंदोलक दगडफेक करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक पोलिस कर्मचारी अजय कुमार जमावाच्या तावडीत सापडले होते. त्यांना जमावातील काहींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाकडून अजय कुमार यांना मारहाण सुरु असतानाच त्यांच्या मदतीला एक नमाज पठण करणारे हाजी कादीर धावून आले. त्यांना पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण होत असल्याचं समजताच त्यांनी जमावाला बाजूला सारत अजय कुमार यांची सुटका केली.

आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

हिंसक जमावाकडून मारहाण खूप भयानक होती. हाजी मोहम्मद यांनी मला संतापलेल्या लोकांच्या तावडीतून सोडवलं नसतं तर मी जिवंत राहिलो नसतो. त्यांनी मला वाचवलं आणि त्यांच्या घरी नेलं. मला जखम झाली होती. माझे कपडे फाटले होते. मला कपडे दिले आणि मी सुरक्षित असल्याचा विश्वास दिला असेही अजय कुमार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.

Video : करिनाच्या पायाला बिलगली भिक मागणारी मुलगी अन्...

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन अजुनही सुरूच आहेत. अनेक राज्यांमध्ये हा कायदा मागे घेण्यासाठी शांततेत आंदोलन केलं जात आहे. गेल्या आठवड्यात देशातील अनेक भागात तणावाचे वातावरण झाले होते. हिंसाचारात काहींचा बळीदेखील गेले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man rescues policeman from violent mob during anti-CAA protest in Firozabad